मणिपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे. अशातच महाराष्ट्रातील काही विद्यार्थी मणिपूर येथे अडकल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना दिलासा दिला. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी मणिपूरच्या एनआयटी, आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील तुषार आव्हाड आणि विकास शर्मा या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आश्वस्त केले. तसेच सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर प्रशासनाशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची विनंती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री @NBirenSingh आणि आसामचे मुख्यमंत्री @himantabiswa यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.
मणिपूरमध्ये अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना विशेष विमानाने…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 7, 2023
विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. सोमवार, ८ मे रोजी हे विमान या अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात येईल. तत्पूर्वी, या विद्यार्थ्यांना मणिपूरहून आसाममध्ये आणण्यात येईल. मणिपूरहून आसामपर्यंत आणताना या विद्यार्थ्यांना विशेष सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
‘द केरळ स्टोरी’च्या टीमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, असं विवेक अग्निहोत्री का म्हणाले?
‘द केरळ स्टोरी’ हा अंतर्बाह्य हादरवून टाकणारा अनुभव
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे घामोळ्याच्या पावडरला फुटला घाम
मोचा चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे हिंसा भडकली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये संचारबंदी लागू केली होती. त्यात आता थोडी शिथिलता देण्यात आली आहे.