चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी

 मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी

चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाइंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाइंग क्लब तत्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

मंत्रालयात मंत्री मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाइंग क्लब सुरू करण्यासंदर्भात आढावा घेतला. ते म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात फ्लाइंग क्लब झाल्याने येथील वैमानिक बनू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील सर्व रीतसर परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा..

स्माईल प्लीज! आदित्य एल- १ ने पाठवला पहिला सेल्फी

गोखले उड्डाणपुलाला अडथळा ठरणारी बांधकामे पाडली

दहीहंडीच्या दिवशी ढगांचे थर आणि वर्षोल्हास

‘भारत उत्पादनाचे नवीन केंद्र असेल’

चंद्रपूर विमानतळाचा वापर सध्या बंद आहे. त्यामुळे येथे फ्लाइंग क्लब सुरू केल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियमानुसार जे २०० तासांचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते, ते येथे देता येईल. विमानतळावरील सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता विमानतळ प्राधिकरणाने कराव्यात. यासाठीचा सेवा रस्ता आणि इतर अनुषंगिक कामे राज्य शासन करेल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version