…म्हणून गोंधळ वाढतो डोक्यात!

…म्हणून गोंधळ वाढतो डोक्यात!

ठाकरे सरकारच्या राज्यात एकीकडे सर्वच क्षेत्रातील प्रवेश परीक्षा तसेच अंतिम परीक्षांचा घोळ कायम असताना, अकरावी प्रवेश परीक्षाही आता अडचणीत आलेली आहे. अकरावीच्या प्रवेशांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा २१ ऑगस्टला घेण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मात्र अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाने अद्याप काहीच माहिती जाहीर केलेली नाही.

पालक-विद्यार्थ्यांमध्ये या प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम आहे. त्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होणार का, संस्थास्तरावरील राखीव जागा (इनहाउस कोटा) असणार का, प्रवेशांसाठी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरणार की सीईटीचे गुण, असे काही प्रश्न पालक-विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहेत. पालकांचे तसेच विद्यार्थी वर्गाचे हे सर्व प्रश्न आजही अनुत्तरीतच आहेत.

सीईटीच्या पहिल्या दिवसापासून नोंदणीमध्येही गोंधळाचे वातावरण होते. पहिल्या दिवशी नोंदणी करताना विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. तसेच संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी बैठक क्रमांक टाकल्यावर तेथे येणारी गुणपत्रिका आणि मूळ गुणपत्रिकेची जुळवाजुळव होत नसल्याने राज्य शिक्षण मंडळावर आता संकेतस्थळातच दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. एकूणच काय तर, शिक्षण क्षेत्रात ठाकरे सरकारला भोपळाच मिळत आहे हे सिद्ध झाले आहे.

हे ही वाचा:
आता उरलाय चिखल…चिखल…आणि फक्त चिखल…

‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार

वरळी लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी ‘या’ दोघांना घेतले ताब्यात

दरडग्रस्तांचे असे केले जाईल पुनर्वसन…

अकरावीची सीईटी झाल्याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश देऊ नये, असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. मात्र प्रवेश प्रक्रिया दरवर्षीप्रमाणेच होणार की यंदा त्यात काही बदल होणार, याची माहिती दिलेली नसल्याने पालक-विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. त्यामुळे प्रवेशांबाबतची माहिती मिळवण्यासाठी पालक कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधत आहेत. परंतु महाविद्यालयांनीही आता अंग झटकले आहे. त्यामुळेच आता विद्यार्थी आणि पालकवर्ग चांगलाच हवालदिल झालेला आहे.

Exit mobile version