चमत्कार!! अंगावर वीज पडल्याने कोमात गेलेली विद्यार्थीनी होतेय पूर्ववत

तिला श्वास घेता येत नसल्यामुळे आणि पोषणाला आधार देण्यासाठी कोडुरूला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

चमत्कार!! अंगावर वीज पडल्याने कोमात गेलेली विद्यार्थीनी होतेय पूर्ववत

भारतीय वंशाची २५ वर्षीय विद्यार्थिनी सुसरोन्या हिला या महिन्याच्या सुरुवातीला अंगावर वीज पडून धक्का बसला होता आणि ती तिच्या आयुष्यासाठी झुंजत होती. तिचे काय होणार ही चिंता सतावत असताना चमत्कार घडला असून आता ती या धक्क्यातून पूर्ण बरे होण्याच्या स्थितीत आहे. तिचे व्हेंटिलेटर उपचार बंद होऊन ती आता बरे होण्याच्या मार्गावर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

 

 

ह्यूस्टन विद्यापीठात माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करणारी परराष्ट्र विनिमय अंतर्गत शिकणारी विद्यार्थिनी सुसरोन्या कोडुरू २ जुलै रोजी सॅन जॅसिंटो स्मारक उद्यानात तिच्या मित्रांसह तलावाजवळून चालत असताना तिच्या अंगावर वीज पडली. यात ती गंभीररित्या जखमी झाली आणि तिची जिवंत राहण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. पण गेल्या आठवड्यापासून चमत्कारिकरित्या तिचा श्वासोच्छवास पुन्हा सुरु झाला असून तिला व्हेंटिलेटर उपचार प्रणालीवरून काढण्यात आले आहे, असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

 

 

तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, ती व्हेंटिलेटरशिवाय प्रतिसाद देत आहे आणि जर तिची ही सुधारणा अशीच कायम राहिली तर तिला व्हेंटिलेटरची गरज भासणार नाही. तिच्या पालकांना हैदराबादहून ह्यूस्टनला आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोडुरूच्या कुटुंबातील सदस्यांनी पीटीआयला सांगितले की, तिच्या पालकांचा अमेरिकेसाठी व्हिसा मंजूर झाला आहे आणि ते पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत.

हे ही वाचा:

चंद्रपुर शहराला पूराचा विळखा, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुण्यात बँकेवर सायबर हल्ला; कोट्यवधी रुपये लंपास

…तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील पीडिताला अधिकाऱ्याच्या खिशातून व्याज

मणिपूर व्हिडिओचा तपास करणार सीबीआय

 

मेंदूचे कार्य पूर्ववत होण्याची वाट पाहत असताना तिला श्वास घेता येत नसल्यामुळे आणि पोषणाला आधार देण्यासाठी कोडुरूला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. “ह्यूस्टन विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थिनी सुसरोन्या कोडुरूला या महिन्याच्या सुरुवातीला विजेचा धक्का बसला होता, त्याबद्दल आमचे अंतःकरण काळजी आणि करुणेने जड झाले आहे”. असे २६ जुलै रोजी ट्विट करणाऱ्या ह्यूस्टन विद्यापीठाकडून त्यानंतर कोणतेही अपडेट मिळालेले नाही.

 

 

विद्यापीठाने ट्विटरवर पोस्ट केले की ती भारतातील तिच्या कुटुंबाच्या संपर्कात होती आणि अशा अनपेक्षित घटनेचा खोल परिणाम आम्ही समजतो. परिस्थितीची निकड ओळखून संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि विद्वान सेवा कार्यालय यूएस व्हिसा प्रक्रियेत तिच्या पालकांना मदत करत आहे. कोडुरूचे चुलत भाऊ सुरेंद्र कुमार कोठा यांनी सांगितले होते, “जेव्हा तिला विजेचा धक्का बसला आणि ती तलावात पडली तेव्हा रक्ताभिसरण पूर्ववत होण्याआधी २० मिनिटे तिला हृदयविकाराचा झटका आला.” त्यानंतर, तिच्या मेंदूवर याचा गंभीर परिणाम झाला आणि ती कोमात गेली.

 

 

कोडुरु कुटुंबिय  “GoFundMe’ या वेबसाईट द्वारे वैद्यकीय खर्चाची पूर्तता करण्यासाठी जगभरातील दानशूरांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे. सुसरोन्या कुदुरू पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत आली होती आणि विद्यापीठात माहिती तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिने तिचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण केला होता आणि इंटर्नशिपच्या संधीची वाट पाहत होती. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या माहितीनुसार, दरवर्षी माणसांवर वीज पडण्याची शक्यता सुमारे १० लाखांपैकी एका व्यक्तीबाबतीतच घडते.

 

 

गेल्या ३० वर्षात वीज पडून वर्षाला सरासरी ४३ मृत्यू झाले आहेत. विजेचा धक्का बसलेल्या लोकांपैकी दहा टक्के लोकांचा मृत्यू होतो, तर ९० टक्के लोकांना विविध प्रकारचे अपंगत्व येते, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version