24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषयुपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अकोल्यातील विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या

युपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अकोल्यातील विद्यार्थिनीची दिल्लीत आत्महत्या

सुसाईड नोटमधून मांडली व्यथा

Google News Follow

Related

दिल्लीमध्ये केंद्रीय नागरी लोकसेवा (युपीएससी) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका अकोल्यातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अंजली असं या विद्यार्थिनीचे नाव असून ती दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमध्ये युपीएससी परीक्षांची तयारी करत होती. तिने हॉस्टेलच्या रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिने चिठ्ठी लिहून ठेवली असून तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने परीक्षा आणि खर्चाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचेर म्हटले आहे.

अकोल्यातील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण ही दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. तिने आत्महत्या करत तिच्या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक बाबींचा उल्लेख केला आहे. सरकारी परीक्षांमधील घोटाळे, रोजगार निर्माणची गरज, वाढलेल्या घराच्या भाड्याचा तणाव अशा बाबींचा उल्लेख तिने केलेला आहे.

अंजली हिने आपल्या नोटमध्ये लिहिले की, पीजी आणि हॉस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. तसेच नोटमध्ये तिने तिच्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. तिने सांगितले की तिने खूप प्रयत्न केले परंतु ती पुढे जाऊ शकली नाही. तिने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. तिचं एकच स्वप्न होता की, पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करेल. तिने तिच्या सर्व मित्र आणि कुटुंबियांना धन्यवाद दिले आहेत, ज्यांनी तिला समर्थन दिले. पण, तिला असे वाटत होते की ती असहाय्य आहे. सुसाईट नोटमध्ये तिने मावशीला धन्यवाद दिले आहे, ज्या नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सुसाइड नोटमध्ये एक स्माईल देखील काढली आहे आणि म्हटले आहे की तिला माहीत आहे की आत्महत्या हा कोणत्याही समस्येचे समाधान नाही. तिने असेही लिहिले आहे की पीजी आणि होस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाहीत.

हे ही वाचा:

अतिरेकी संघटना हिजबुल्लाचा इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात पावसाचा प्रकोप; विविध घटनांमध्ये १६ लोकांचा मृत्यू

गांधी-वाड्रा परीवाराच्या धर्म-जातीबाबत लपवाछपवी का? |

बीजेडीच्या खासदाराचा काल राजीनामा, आज भाजपात प्रवेश !

पीडितेच्या आईने सांगितले की, “आम्ही तिच्यावर खर्च करत असलेल्या पैशांची तिला काळजी होती. परंतु, आम्ही तिला काळजी करू नकोस असं सांगितलं होतं. यातूनही पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. परंतु, तिने कोणताही विचार न करता टोकाचा निर्णय घेतला.” याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा