तेलंगणातील यादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील २५ वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झालेल्या कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. गुंटीपल्ली सौम्या (वय २५) असे तिचे नाव आहे. २६ मे रोजी हा अपघात घडला.
हेही वाचा..
अभिनेता रणदीप हुड्डाने अंदमानला घेतले सावरकरांचे दर्शन!
केजरीवालांना दणका, जामीन मुदतवाढ अर्जावर सुनावणीस नकार
“पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अस्तित्वाची लढाई”
९० एकर जमीन बळकावून शेख शाहजहानने २६१ कोटी रुपये कमावले!
फ्लोरिडा अटलांटिक विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या गुंटीपल्ली सौम्या हिला रस्ता ओलांडताना भरधाव कारने धडक दिली या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. एका दुकानात आपल्याला लागणारा किराणा माल घेऊन सौम्या ही घरी जात असताना हा अपघात घडला.
सौम्या ही दोन वर्षापूर्वी शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. तिची पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर ती नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होती. सौम्या ही मूळची तेलंगणातील यादगारिपल्ले गावची असून ती नोकरीच्या शोधात होती.
त्यांच्या मुलीच्या मृत्यूची दुःखद बातमी मिळाल्यावर तिचे आई-वडिलांना जबरदस्त हादरा बसला आहे. सौम्याच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह तेलंगणात परत आणण्यासाठी सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.