25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषशाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

पुण्यातील घटना

Google News Follow

Related

पुण्यात एका शाळेच्या इमारतीवरून पडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. जिन्याच्या रेलिंगवर घसरगुंडी खेळताना ही दुर्दैवी घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिली आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

काळेवाडीत राहणारा सार्थक हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता. साधारण सकाळी दहाच्या सुमारास सार्थक हा लोखंडी रेलिंगवर खेळत होता. शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर तो घसरगुंडी खेळत होता. पण, रेलिंगवर घसरगुंडी खेळणं धोकादायक असल्याचे त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले. इथं खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेल, असं म्हणत त्या मित्राने सार्थक यास रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र, सार्थक याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

हे ही वाचा:

भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!

‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’

‘ती माझी चूक होती’

मित्राच्या बोलण्याकडे कानाडोळा करत सार्थक त्याच्याच धुंदीत खेळत होता. मात्र, अचानकपणे त्याचा तोल गेला आणि तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला, तातडीनं त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं. पण, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो खेळत असताना तोल जाऊन पडला. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत, अशी माहिती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा