22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषस्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

पाचवी ऍशेस कसोटी ठरणार अखेरची

Google News Follow

Related

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने शनिवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या ऍशेस कसोटीच्या तिसर्‍या दिवसाच्या समाप्तीनंतर त्याने हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे ब्रॉडच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीवर पडदा पडणार आहे. जेम्स अँडरसननंतर ६०० कसोटी बळी घेणारा ब्रॉड अलीकडेच दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

३७ वर्षीय ब्रॉडने आपल्या कारकिर्दीत १६७ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ५६ टी- २० सामन्यांमधून ८४५ विकेट घेतल्या आहेत. ब्रॉड सध्या चालू असलेल्या ऍशेसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे, त्याने नऊ डावांत २० विकेट घेतल्या आहेत.

अलीकडेच, ब्रॉड हा दिग्गज जेम्स अँडरसननंतर कसोटी क्रिकेटमध्ये ६०० किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. ब्रॉडने मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत ही कामगिरी केली. अलीकडेच, ब्रॉड ऍशेसमध्ये १५० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा ग्लेन मॅकग्रा आणि शेन वॉर्ननंतरचा तिसरा गोलंदाज बनला आहे.

हे ही वाचा:

काश्मीरच्या कुलगाममध्ये सैनिक बेपत्ता; गाडीत सापडले रक्त

युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन

५०० वृक्ष तोडणाऱ्या बिल्डरला झाकणारा तो मोठा नेता कोण?

ब्रॉड हा खालच्या फळीतही एक चांगला फलंदाज आहे. त्याने १८ च्या सरासरीने एक शतक आणि १३ अर्धशतकांसह तीन हजार ६५६ धावा केल्या आहेत. लंडनमधील प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर ऑगस्ट २०१० मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने १६९ धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारली होती.

२८ ऑगस्ट २००६ रोजी ब्रॉडने ब्रिस्टलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मायकेल वॉन हा त्याचा पहिला कर्णधार होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा