भारताला स्वातंत्र्य होऊन नुकतीच ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीने महामंडळाने एसटीमध्ये मोफत प्रवास करण्याचा मुभा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे ग्रामीण भागात एसटीची प्रवासी संख्या वाढताना दिसत आहेत. या योजने अंतर्गत एसटीमधून २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान राज्यात ९ लाख ५० हजार ११७ ज्येष्ठ नागरिकांनी एसटीने मोफत प्रवास केला आहे. त्यामुळेच महामंडळाला राज्य सरकार कडून प्रतिपूर्तीचे जे पैसे मिळतात. त्यात उत्पन्नात वाढ होणार आहे.
एसटीची प्रवासी संख्या वाढवण्यामध्ये या सवलतीची मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. एसटी महामंडळ समाजातील विविध घटकांवर २९ प्रकारच्या विविध सवलती देण्यात येतात. त्यात आता ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत प्रवासाच्या सवलतीची त्यात भर पडली आहे. यासाठी सध्या एसटी महामंडळाला वर्षाला सवलत धारकांच्या प्रतिपूर्ती रकमेपोटी राज्य शासन एसटी महामंडळला १५०० कोटी रुपये देते. तसेच या योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यांनी सर्वाधिक बाजी मारल्याचे दिसते. लातूर विभागातून सर्वाधिक ९३ हजार २० प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्या पाठोपाठ सोलापूर, परभणी, बीड, जळगाव या विभागांचा क्रमांक लागतो.
हे ही वाचा:
इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर
पाकिस्तान विरुद्धच्या विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त
सोनाली फोगाट प्रकरणात आता सीबीआयची उडी
महाराष्ट्रात सध्या ४० लाख ज्येष्ठ नागरिक एसटीच्या ५० टक्के मोफत प्रवासी सेवेचा लाभ घेत आहेत. मोफत सेवेचा लाभ घेतलेल्यांपैकी १५ लाख ज्येष्ठ नागरिक हे ७५ वर्ष पूर्ण झालेले आहेत. ज्येष्ठ नागरिक देवदर्शन, तीर्थक्षेत्रास जाणे, औषध उपचारासाठी मोठ्या शहरात जाणे तसेच पाहुण्यांकडे जाण्यासाठी एसटीने प्रवास करतात. या सवलतीचा फायदा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांनी जास्त प्रमाणात घेतला आहे. आता येणाऱ्या सणावाराला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळेल, त्यानंतर आलेल्या दिवाळीतही ज्येष्ठांचा उत्तम प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.