अंदमान आणि निकोबारमध्ये जोरदार भूकंप

रिश्टर स्केलवर ५.८ची नोंद

अंदमान आणि निकोबारमध्ये जोरदार भूकंप

भारताच्या अंदमान निकोबार बेटावर शनिवारी रात्री जोरदार भूकंप झाला. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या मते भूकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल नोंदली गेली. या वर्षीचा हा तिसरा मोठा भूकंप आहे. भूकंपाचे केंद्र १० किमी खोल आणि पोर्ट ब्लेअरपासून १२५ किमी दूर होते. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

शनिवारी रात्रीची वेळ असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. काही जण घराबाहेरही आले. त्यानंतर मात्र कोणतेही भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत. मात्र नागरिकांनी संपूर्ण रात्र घाबरलेल्या मनस्थितीतच काढली. गेल्या वर्षी अंदमान निकोबारमध्ये २४ तासांत ३.८ ते ५ तीव्रतेचे २२ भूकंप झाले होते.

अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंप आला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल होती. याआधी २३ जुलै रोजी सकाळी आठ वाजून ४६ मिनिटांनी भूकंप आला होता. तेव्हा या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल होती.

हे ही वाचा:

चंद्रपुर शहराला पूराचा विळखा, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुण्यात बँकेवर सायबर हल्ला; कोट्यवधी रुपये लंपास

…तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील पीडिताला अधिकाऱ्याच्या खिशातून व्याज

मणिपूर व्हिडिओचा तपास करणार सीबीआय

अरुणाचल प्रदेशमध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजून ५० मिनिटांनी भूकंप आला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, अरुणाचल प्रदेशातील पैंगिनच्या उत्तरेकडील भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केवर या भूकंपाची तीव्रता ४.० नोंदली गेली. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. याआधी अरुणाचलच्या तवांगमध्ये २२ जुलै रोजी ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता.

Exit mobile version