28 C
Mumbai
Sunday, November 3, 2024
घरविशेषमहाराष्ट्रात १ जूनपर्यंत 'कडक निर्बंध'

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत ‘कडक निर्बंध’

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील ‘कडक निर्बंधांची’ मुदत १ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे. आता ब्रेक द चैनचे निर्बंध १ जून सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकोरमायकोसिस वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले होते. यानंतर आता हे निर्बंध येत्या १ जूनपर्यंत लागू राहणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शासनाने जाहीर केले आहे.

या परिपत्रकानुसार महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणं आवश्यक आहे. हा अहवाल प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासांमधील असणं आवश्यक आहे. दूध संकलन आणि वाहतुकीवर निर्बंध नसतील. तसेच दुधाच्या रिटेल विक्रीला स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांच्या मर्यादेत सूट असेल, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

भारताने इस्रायलविरोधी भूमिका घ्यावी-काँग्रेस

महाराष्ट्र मॉडेल अनुसरा, पीआर आणि सोशल मीडियासाठी पैसे उधळा

इस्राएलविरुद्ध इस्लामिक राष्ट्र आक्रमक, ‘ही’ कारवाई करणार

पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र

ब्रेक द चेन नवी नियमावली

१) परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना ४८ तास आधीचा आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक

२) महाराष्ट्रातून घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्या आरटीपीसीआर रिपोर्ट बंधनकारक असणार

३) परराज्यातून मालवाहूतक करणा-यांना आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असावा तो ७ दिवस ग्राह्य धरणार

४) मालवाहतूक ट्रकमध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाचं प्रवेश

५) बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थनानिक आपत्ती व्यवस्थापनाने तो बंद करण्याचा निर्णय घ्यावा

६) दूधाचे कलेक्शन, वाहतूक आणि प्रकिया यांना परवानगी असणार

७) एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो आणि मेट्रो मध्ये प्रवाशांची परवानगी

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा