नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!

पालकमंत्री गिरीश महाजन यांचे वक्तव्य

नांदेड मधील रुग्णांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होईल!

नांदेड मधील शासकीय रुग्णालयात २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला.या मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.याबाबत मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले, नांदेड मधील घटना ही अत्यंत हृदयद्रावक आहे.या घटनेत २४ जणांचा मृत्यू झाला आहे.या मृतांमध्ये १२ लहान बालकांचा आणि प्रौढ पुरुष, महिलां मिळून १२ जणांचा समावेश आहे.घडलेली घटना ही गंभीर आहे.

या प्रकरणी नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सोबत बोलणे झाले असून त्यांना चौकशीचे तात्काळ आदेश देण्यात आले आहेत.दवाख्यान्यातील डीन यांच्याशी संपर्क साधत घटना कशी घडली,दवाखान्यात औषधे, ऑक्सिजन, डॉक्टरांची कमतरता होती का? याची चौकशी केली आहे.घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

हे ही वाचा:

बांगलादेशात नऊ महिन्यात डेंग्यूने घेतेले १ हजारहून अधिक बळी

ऍमेझॉनमध्ये पाण्याचे तापमान वाढले; १००हून अधिक डॉल्फिनचा मृत्यू

अभिनेता विवेक ऑबेरॉयची केली दीड कोटींची फसवणूक; एकाला अटक

नांदेडमधील ३१ तर छ. संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात १० रुग्णांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिले आहेत.गिरीश महाजन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने दवाखान्यातील सध्याची परिस्थिती आणि चौकशी करण्याकरिता मंत्री आज नांदेड जिल्ह्याला रवाना झाले.नेमण्यात आलेली उच्चस्तरीय समिती नांदेडला पोहचली असून चौकशीला सुरुवात झाली आहे.दोन तीन दिवसात समितीकडून चौकशीचे रिपोर्ट येतील. त्यानंतर या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्या दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे, मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार दवाखान्यात ७५० रुग्ण आहेत यामध्ये वयस्कर रुग्ण, गंभीर आजाराचे रुग्ण,अपघात झालेले रुग्ण असल्याचे महाजनांनी सांगितले.मात्र, रुग्णालयात दिवसभरात २४ रुग्णांचा मृत्यू होण्याची ही बाब अत्यंत गंभीर असून शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून याबाबत आम्ही चौकशी करत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

 

 

 

 

Exit mobile version