राजस्थानच्या भजनलाल सरकारने गुन्हेगारांना कडक संदेश देण्यासाठी मोठे पाऊल उचलत कोटाच्या कोचिंग सिटीतील हिस्ट्रीशीटर हजरत अली उर्फ गुड्डूच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. यूआयटी आणि कोटा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. हजरत अलीने कोटा येथील उद्योग नगर भागातील गोविंद नगर येथील सरकारी जमीन आपल्या ताब्यात घेवून तेथे दोन घरे बांधली होती. याच बांधकामावर प्रशासनाने कारवाई केली आहे. हजरत अली हा मोठा गुंड आहे, कोटा येथील गुन्हेगारी जगतात त्याचे मोठे नाव आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जमीन हडप, तस्करी, अपहरण असे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
आज (५ सप्टेंबर) सकाळी केडीएचे उपायुक्त हर्षित वर्मा, डेप्युटी एसपी योगेश शर्मा आणि उद्योग नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी जितेंद्र सिंह यांच्यासह मोठ्या पोलीस बंदोबस्त कारवाई दरम्यान तैनात करण्यात आला होता. सुमारे ४००० चौरस फूट जागेवर बांधलेली बेकादेशीर बांधकामे प्रशासनाने जमीनदोस्त करण्यात आली.
हे ही वाचा :
सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या विकासासाठी सहकार्य करणार
तेलंगणात ६ नक्षलवाद्यांचा खात्मा !
बलात्कारानंतर तेलंगणात आदिवासींचा संताप, मुस्लिमांची घरे, दुकाने पेटविली
मुंबई पोलिसांनी काढली ड्रग्स माफियांची वरात, टोळीच्या चार सदस्यांना अटक !
दरम्यान, गुंड हजरत अलीवर ५० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. आतापर्यंत त्याला १९ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. हजरत अलीच्या धास्तीमुळे त्याच्या विरोधात कोणीही साक्ष द्यायला तयार नसल्याचे सांगितले जाते. हजरत अलीसह त्याच्यावर भावावर देखील ५४ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. जाहिद असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी (६ सप्टेंबर) देखील बुलडोजरची मोठी कारवाई होणार असल्याची माहिती आहे. राजस्थानमध्ये भजनलाल सरकार आल्यानंतर गुन्हेगारांविरोधात बुलडोझरच्या कारवाई वाढ झाली आहे.