विनेश फोगाटवर केली ‘ही’ मोठी कारवाई

विनेश फोगाटवर केली ‘ही’ मोठी कारवाई

भारताची आघाडीची स्टार पैलवान विनेश फोगाटला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ही कारवाई केली असून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिने नियमांचे उल्लघंन करत शिस्तभंग केल्याचे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. विनेशसह पैलवान सोनम मलिकलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघीही ऑलिम्पिक खेळांमध्ये विशेष कामगिरी करु शकल्या नाहीत.

विनेश फोगाट टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदक पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. पण तिचं प्रदर्शन सुरुवातीपासूनच निराशाजनक होतं.  ती क्वॉर्टरफायनलमध्ये स्पर्धेबाहेर गेली होती. तिला महिलांच्या ५३ किलो वजनी गटात पराभव पत्करावा लागला. विनेशला बेलारूसच्या वॅनेसा कलाडजिंस्कायाने मात दिली होती. रेंसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने विनेश फोगाटला १६ ऑगस्टपर्यंत पाठवलेल्या नोटीसवर उत्तर देण्यास सांगितले आहे. विनेश टोक्यो ऑलिम्पिक पूर्वी हंगेरी येथे सराव करत होती. तेथूनच ती थेट टोक्योला आली होती. त्यानंतकर इतर खेळाडूंसोबत सहभागी होऊन तिने सराव सुरु केला. यावेळी तिचे प्रशिक्षक वोलर अकोसही तिच्यासोबत होते.

विनेशने भारतीय संघाचे स्पॉन्सर शिव नरेश या कंपनीच्या नावाच्या जागी नाईकी ब्रँडचे कपडे घातले होते. त्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ‘अशाप्रकारचे वागणे म्हणजे शिस्तभंग करणे आहे. त्यामुळे तिला निलंबित करण्यात आले आहे. जोवर ती या सर्व आरोपांबद्दल फेडरेशनला योग्य ते उत्तर देत नाही तोवर ती कोणत्याच प्रकारच्या रेसलिंग स्पर्धांत भाग घेऊ शकणार नाही.’

हे ही वाचा:

भांडूपमध्ये बसचा भीषण अपघात

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

गेले देशमुख कुणीकडे?

विनेशने टोक्योमध्ये तिला हॉटेल रुमही भारतातून आलेल्या अन्य पैलवान सोनम मलिक, अंशु मलिक यांच्याजवळ दिल्यानंतरही तिने वाद घातला होता. हे सर्व खेळाडू भारतातून आले असल्याने मला कोरोनाचा धोका होऊ शकतो असं तिचं म्हणनं होतं. सोबतच तिची सरावाची वेळ इतर खेळाडूंसोबत असल्याने तिने सरावाला देखील दांडी मारली होती.

Exit mobile version