24 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025
घरविशेष‘मोदींचे हात बळकट करा... तेच तुम्हाला या वादळातून सुखरूप तारतील’

‘मोदींचे हात बळकट करा… तेच तुम्हाला या वादळातून सुखरूप तारतील’

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे आवाहन

Google News Follow

Related

रशिया-युक्रेन संघर्ष असो, गाझावरील आक्रमण असो किंवा दक्षिण चीन समुद्रातील संघर्ष असो, भारत आता केवळ ठोस नाही तर आत्मविश्वासाने भूमिका घेत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केले. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावरील भूमिका विशद केली. अनुभवी, विवेकी, व्यावहारिक व धाडसी नेतृत्वाच्या मोदी सरकारने परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत जी काही पावले उचलली आहेत, ती मतदारांसमोर आहेत. तेव्हा नरेंद्र मोदींचे हात बळकट करा कारण तोच माणूस आहे, जो तुमची या वादळातून काळजी घेणार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकांवर परराष्ट्र धोरणाचा परिणाम होत नाही, ते अंतर्गत मुद्द्यांवर अधिक केंद्रित आहेत, असे म्हटले जाते, असा प्रश्न त्यांना विचारला असता जयशंकर यांनी याबाबत भूमिका मांडली. ‘मला वाटते, आता दोन गोष्टी बदलल्या आहेत. परराष्ट्र धोरण काय आणि देशांतर्गत धोरण काय यातील रेषा आता पुसट झाली आहे. त्यामुळे तुम्ही (भारत) रशियाकडून तेल विकत घेत असाल तरी तुम्ही त्यासाठी पेट्रोल पंपावर पैसे खर्च केलेले असतात. त्यामुळे सरतेशेवटी ते देशांतर्गत धोरणच असते, असे ते म्हणाले. नागरिकांची परराष्ट्र धोरणाबाबत धारणा बदलली आहे, असे निरीक्षणही त्यांनी मांडले.

‘निवडणुकांदरम्यान मी जवळपास नऊ किंवा १० राज्यांमध्ये गेलो होतो, तेव्हा मला परराष्ट्र धोरणावर जवळजवळ नेहमीच प्रश्न विचारले गेले. त्यामुळे मला वाटते की, त्यांना याचे गांभीर्य जाणवू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला जागतिक स्तरावर कुठे पोहोचवले आहे, याचा त्यांना अभिमान आहे. ही एक बाब. दुसरे म्हणजे बाहेरच्या जगात असणारा धोका. तो साथीचा रोग असू शकतो, तो दहशतवाद असू शकतो, त्यामुळे तुम्ही बाहेर राहू शकणार नाही, तुम्हाला मायदेशी परतावे लागेल, हे समजू लागले आहे. तुम्ही भाजपचा जाहीरनामा पाहिला तर कळेल की, आपण परराष्ट्र धोरणाला यापूर्वी कधीही इतके स्थान दिले नव्हते,’ असे जयशंकर यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

‘अरविंद केजरीवाल यांच्या सहकाऱ्याने माझ्या पोटात मारले, लाथही मारली’

बोटावर शस्त्रक्रिया करण्यासाठी नेले; ‘चुकून’ जिभेवर शस्त्रक्रिया!

नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिला समाजाला उद्ध्वस्त करत आहेत

इस्लामवादी हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडतात

युक्रेन, गाझामधील युद्ध, जगभरात होणारे दहशतवादी हल्ले या अशांततेचे व्यवस्थापन करण्याचा मार्ग काय आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.‘हे खरे आहे. आपण एका संकटातून दुसऱ्या संकटाकडे जात आहोत; खरं तर, आपण एकाच वेळी अनेक संकटांमध्ये आहोत आणि त्याची सुरुवात एक आणि नंतर दोन आणि नंतर तीन झाली. म्हणजे बघा, कोविडचा प्रभाव अजूनही कायम आहे. युक्रेन युद्ध तिसऱ्या वर्षात आहे. इस्रायल-गाझा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता. इस्रायल-इराण अजूनही धुमसत आहे. अरबी समुद्रात होणारे हल्ले, ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले हे भारतीय जहाजांसाठी खूप धोक्याचे आहेत.

आणखी पूर्वेकडे गेल्यास चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान कायमस्वरूपी, किंबहुना तीव्र संकटात आहे. अफगाणिस्तान खूप तणावात आहे. दक्षिण चीन समुद्र सागरी विवाद, नंतर अमेरिका-चीन स्पर्धा, रशिया. इतर प्रदेशांमधील दहशतवाद, प्रशासनाचे प्रश्न आहेत. जर एखाद्याने जगाच्या स्थितीचे वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन केले तर ते खरोखर खूप अशांत आहे, खूप अस्थिर आहे आणि ही परिस्थिती अधिकाधिक गुंतागुंतीची होत आहे, असे निरीक्षण त्यांनी मांडले. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो, असा प्रश्न त्यांना विचारला असता, त्यांनी ठाम उत्तर दिले.

‘मला वाटते आपण सर्वांत महत्त्वाची गोष्ट करू शकतो ती म्हणजे अनुभवी, शांत, व्यावहारिक, पायाभूत पण धैर्यवान नेतृत्वाची निवड, जे त्वरित प्रतिसाद देऊ शकेल. युक्रेनमधील आमच्या विद्यार्थ्यांबाबत आम्ही त्वरित संपर्क साधून कळवले, तसा प्रतिसाद आम्हाला द्यावा लागेल. आम्ही रशियन तेल खरेदी करू का, याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल. आम्ही ‘क्वाड’वर दबाव आणू शकतो का? आम्ही चिनी दबावापुढे झुकतो की चिनी दबावापुढे ताठ उभे राहतो… आदी बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण सन २००७मध्ये खूप वर्षांपूर्वी आम्ही झुकलो होतो. म्हणून मला आज वाटतं, यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदींचे हात बळकट करणे, कारण तोच माणूस आहे जो वादळी काळात तुमची मदत करणार आहे. आपण या अशांत पाण्यात मार्गक्रमण करत असताना तुमच्या जहाजाचे सुकाणू एक अतिशय खंबीर, स्थिर, अनुभवी हातांमध्ये असणे गरजेचे आहे,’ असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा