दिल्लीच्या इंद्रलोकमध्ये गेल्या शुक्रवारी रस्त्यावर नमाज पठणाच्या वेळी झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या शुक्रवारी(१५ मार्च) परिसरात अत्यंत कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती.मोठ्या सुरक्षा बंदोबस्तात रमजानच्या अगोदर पहिल्या शुक्रवारची नमाज शांततापूर्ण वातावरणात अदा करण्यात आली.मात्र, यावेळी रस्त्यावर नमाज अदा करण्यात आली नाही.मशिदीच्या आवारात राहून सर्वांनी नमाज अदा केली.
सकाळपासूनच इंद्रलोकमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली होती.संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.ड्रोनच्या माध्यमातूनही पोलिसांनी नजर ठेवली होती. मशिदीच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावून कोणीही नमाज अदा करणार नाही, याची काळजी घेतली जात होती.मात्र, गेल्या आठवडयाच्या तुलनेत या शुक्रवारी गर्दी कमी होती.
हे ही वाचा..
अनेक कुलकर्णी मुंबई संघात येतील पण धवल कुलकर्णी सारखे कोणी नाही
ड्रोन हल्ल्यावर तेलंगणा पोलिसांचे ‘गरुड’ ठेवणार तीक्ष्ण नजर!
इलेक्टोरल बाँड्सचे सर्वात मोठे खरेदीदार फ्यूचर गेमिंगचे सँटियागो मार्टिन
मुंबई: १९ वर्षीय नोकराने आपल्या मालकिणीचा गळा घोटला!
दरम्यान, यापूर्वी नमाज पठणासाठी लोक रस्त्यावर उतरून पठण करत असत.त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असे.मात्र,यावेळी तसे झाले नाही.लोकांनी रस्त्यावर नमाज अदा न करत सर्वांनी मशिदीच्या आवारात केली.त्यामुळे वाहतूक सुरळीतपणे सुरु राहिली.याशिवाय अशीही माहिती आहे की, ड्रोनशिवाय गुप्तचर यंत्रणा देखील सक्रिय ठेवण्यात आली होती आणि संपूर्ण परिसरातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात जात होते.पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे हे सर्व शक्य झाले.