तेलंगणात भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी आठ जागा जिंकल्या, तर हैदराबादमध्ये एआयएमआयएमने विजय मिळवला. सन २०१४ आणि २०१९मध्ये बीआरएसने राज्यात अनुक्रमे ६४.७ टक्के आणि ५२.९ टक्के जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदा हा पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही. सन २०२३च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सत्ता गमावल्यापासून बीआरएसची पराभवाची मालिका अद्याप कायम आहे.
बीआरएसने सन २०१४मध्ये तेलंगणामध्ये ३४.७ टक्के मते मिळवली होती. सन २०१९पर्यंत, जरी त्यांच्या जागा कमी झाल्या, तरीही पक्षाने ४१.३ टक्के मते वाढवण्यात यश मिळवले. तथापि, यावेळी, पक्षाला २०१४मध्ये मिळालेल्या मतांच्या निम्मीही मते मिळवता आली नाहीत. सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसची मतांची टक्केवारी १६.७ टक्के होती. राज्यातील सर्व १७ जागांमध्ये बीआरएसचा मतटक्का घटला.
हे ही वाचा:
घोषणा ‘४०० पार…’ची निकाल ३०० च्या आत… भाजपाचे गणित कुठे चुकले?
पुण्यात हरले मोरे-धंगेकर, जिंकले मुरलीधर!
अबब…अमित शहांचे लीड ७ लाखावर !
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये खणखणीत राणेंचे नाणे!
बीआरएसच्या मतांमध्ये घट झाली असताना तेलंगणात भाजप आणि काँग्रेसच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०१९मधील २९.५ टक्के आणि १९.१ टक्क्यांच्या तुलनेत यावेळी काँग्रेस आणि भाजपने अनुक्रमे ४०.१ टक्के आणि आणि ३०.०१ टक्के मते मिळवली.
बीआरएसच्या घसरणीचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?
बीआरएसने सन २०१९मध्ये नऊ जागा जिंकल्या होत्या. सन २०२४मध्ये काँग्रेसने यापैकी सहा जागा जिंकल्या, तर भाजपने तीन जागा जिंकल्या आहेत. सन २०२३च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या ६४ जागा जिंकल्या त्यापैकी ४७ जागा पूर्वी बीआरएसकडे होत्या. सन २०२३ आणि २०२४च्या निकालावरून असे दिसून येते की, तेलंगणातील बीआरएसच्या घसरणीचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाला आहे. भाजपने २०१९मध्ये जिंकलेल्या चार जागा राखून ठेवल्या आहेत, तसेच काँग्रेसच्या ताब्यातील एक जागा आणि बीआरएसच्या तीन जागा मिळवल्या आहेत.