कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!

गोवा विमानतळावर घडली घटना

कुत्र्याने बंगळुरूला परतून लावले विस्तारा विमान!

एका भटक्या कुत्र्याने गोव्याला जाणारे विस्तारा हे विमान दाबोलीम विमानतळावर न उतरवताच बेंगळुरूला परतवून लावले आहे.हवाई वाहतूक नियंत्रकाला गोवा विमानतळाच्या धावपट्टीवर एक भटका कुत्रा दिसला.त्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रकाने गोव्यातील दाबोलिम विमानतळावर उतरणारे विस्तारा विमान हे उतरवल्याशिवाय बंगळुरूला परतले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.ही घटना सोमवारी दुपारी घडल्याचे त्यांनी सांगितले.

दाबोलीम विमानतळाच्या धावपट्टीवर एक भटका कुत्रा दिसल्याने वैमानिकाला “काही वेळ थांबायला” सांगण्यात आले, पण “त्याने बेंगळुरूला परतणे पसंत केले,” असे गोवा विमानतळाचे संचालक एसव्हीटी धनमजय राव यांनी सांगितले.गोव्यातील दाबोलिम विमानतळ हे नौदलाच्या आयएनएस हंसा तळाचा एक भाग आहे.

विस्तारा विमान UK ८८१ हे सोमवारी दुपारी १२.५५ वाजता बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघाले आणि दुपारी ३.०५ वाजता परतले, असे सूत्रांनी सांगितले.त्यानंतर विमानाने पुन्हा बेंगळुरूहून ४.५५ वाजता उड्डाण केले आणि संध्याकाळी ६.१५ वाजता गोव्यात पोहोचले.

हे ही वाचा:

गर्दीमुळे डब्यात चढूच शकला नाही; रेल्वेकडे मागितले एसी तिकिटाचे संपूर्ण पैसे!

केरळातील पाच वर्षांच्या मुलीवरील बलात्कार, हत्येप्रकरणी आरोपी अश्फाकला फाशी

कर्नाटकात परिक्षागृहात हिजाब घालण्यास मनाई!

विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या उपांत्य फेरीचा इतिहास काय सांगतो?

विस्तारा विमानसेवेने सोमवारी ट्विट करत म्हणाले, बेंगळुरू ते गोवा जाणारी (BLR-GOI) फ्लाइट UK८८१ ही गोवा विमातळावरील धावपट्टीच्या प्रतिबंधामुळेबेंगळुरूकडे वळवण्यात आली आहे आणि १५:०५ वाजता बेंगळुरूला पोहोचण्याची अपेक्षा आहे.त्यानंतर दुसऱ्या पोस्ट मध्ये म्हटले की, UK८८१ फ्लाइट जी बेंगळुरूकडे वळवण्यात आली होती ती बेंगळुरूहून १६:५५ वाजता निघाली आहे आणि १८:१५ वाजता गोव्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, गोवा विमानतळाचे संचालक एसव्हीटी धनमजय राव म्हणाले की, विमानतळाच्या धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांनी प्रवेश केल्याची अनेक उदाहरणे आहेत, परंतु ग्राउंड स्टाफने हा परिसर त्वरित साफ केला आहे.तसेच “गेल्या दीड वर्षांच्या माझ्या कार्यकाळातील ही पहिलीच घटना आहे,” ते पुढे म्हणाले.

 

Exit mobile version