26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषरशियाला वाढवायचीय लोकसंख्या; मुलं जन्माला घाला, सरकारकडून मदत घ्या!

रशियाला वाढवायचीय लोकसंख्या; मुलं जन्माला घाला, सरकारकडून मदत घ्या!

सेक्स मंत्रालयाचीच करणार स्थापना

Google News Follow

Related

रशियन कार्यालयातील लोक काम करण्यासोबतच आता मुले जन्माला घालण्याचे काम करणार आहेत. ऑफिसमध्ये रोमान्स आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेचा वापर करून मूल जन्माला घालण्याचा प्रयत्न करा, असे सांगितले जात आहे. एवढेच नाही तर मुलाला जन्म दिल्यावर त्यांना मोठी रक्कमही मिळणार आहे. तसेच डेटिंग अन् लग्नासाठी सरकार पुरवणार आर्थिक साह्य करणार आहे. यासाठी रशिया ‘सेक्स मिनिस्ट्री’ स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

रशिया-युक्रेनचे तीन वर्षांपासून युद्ध सुरु आहे. अशातच रशियामधील जन्मदर चिंताजनक पातळीवर कमी झाला आहे. ही परिस्थिती देशाच्या भविष्यासाठी चांगली नाही. या कारणास्तव, जन्मदरावर उपाय म्हणून आता रशिया ‘सेक्स मिनिस्ट्री’ स्थापन करण्याच्या तयारीत आहे. रशियन अधिकारी केवळ जन्मदर वाढविण्याचा प्रयत्न करीत नाहीत तर ते सर्व काही करणार आहेत, जे एकेकाळी वाईट मानले जात होते.

द मिररच्या वृत्तानुसार, रशियन अधिकारी देशाची लोकसंख्या वाढवण्याच्या उद्देशाने विविध प्रस्ताव आणत आहेत.  या अंतर्गत, लोकांनी रात्री १० ते पहाटे २ या वेळेत घरातील इंटरनेट आणि दिवे बंद करावे, जेणेकरून आपल्या जोडीदाराशी जवळीकपणा वाढेल. जोडप्यांमध्ये जवळीक वाढवण्यासाठी अनेक मार्ग शोधले जात आहेत.

हे ही वाचा :

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘विराट’ दर्शन; चक्क हिंदी आणि पंजाबीत

अतुल भातखळकर २४ तास जनतेची सेवा करणार नेता, पुन्हा निवडून येण्याची खात्री!

भाजपा महायुतीच्या बहुमतामुळे पवार, ठाकरे, पटोले हताश!

ट्रम्प यांचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्ज भारतासाठी ठरणार फायद्याचे!

दुसऱ्या प्रस्तावात, पहिल्या डेटवर जाण्यासाठी जोडप्यांना सरकार पाच हजार रूबल (४,३०२ रुपये) द्यावयाची कल्पना सुचवण्यात आली आहे. मुलाला जन्म दिल्यावर तुम्हाला ९.५ लाख रुपये मिळतील, असेही एका प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी राज्याने निधी दिला पाहिजे, असे आणखी एका प्रस्तावात सुचवण्यात आले आहे. तसेच गर्भधारणेच्या संभाव्यतेस प्रोत्साहन देण्यासाठी हॉटेलचा खर्च २६,३०० रूबल (२२,६३२ रुपये) असावा, यांसारखे अनेक विचित्र उपाय रशियन अधिकार्‍यांकडून सुचविले जात आहेत.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, रशियाचा जन्मदर हा गेल्या २५ वर्षांतील आतापर्यंतचा सर्वांत कमी जन्मदर आहे. रशियामध्ये जन्मलेल्या मुलांची संख्या जूनमध्ये ६ टक्क्यांनी घटून ९८,६०० झाली आहे. मासिक आकडा पहिल्यांदा एक लाखाच्या खाली आला आहे. हे राष्ट्राच्या भविष्यासाठी आपत्तीजनक असल्याचे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी जुलैमध्ये म्हटले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा