जय जवान!! जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांची कहाणी अभिमानास्पद!

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झुंजताना पाच जवानांना आले होते हौतात्म्य

जय जवान!! जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांची कहाणी अभिमानास्पद!

जम्मू-काश्मीरच्या राजौरी येथील केसरी पर्वतीय भागात झालेल्या चकमकीत पाच जवान हुतात्मा झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या जवानांना जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि नॉर्दर्न आर्मी कमांडर उपेंद्र द्विवेदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या गावी पाठवण्यात आले. या सगळ्या जवानांची जीवनयात्रा अकाली संपली असली तरी त्यांनी देशासाठी जो सर्वोच्च त्याग केला त्याची कहाणी अभिमानास्पद आहे. त्यांच्या कुटुंबियांनीही या शहीद जवानांना अश्रुपूर्ण नयनांनी सलाम ठोकला आहे.

हवालदार नीलम सिंग चिब यांचे पार्थिव शरीर अखनूरला पोहोचले, तेव्हा तिरंगा धारण केलेला शोकाकूल जनसागर तिथे उसळला होता. हा जनसागर जम्मूच्या जौरियनमधील त्यांच्या घरापर्यंत पोहोचला. त्यानंतर या जवानावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराने नाईक अरविंद कुमार (३३) यांचे पार्थिव पालमपूर येथील होल्टा छावणीत आणले.

त्यांचे भाऊ भूपेंद्र सांगतात… ‘अरविंदला नेहमी सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करायची होती. लष्करात भरती झाल्यावर त्याने इतरांनाही सैनिक होण्यासाठी प्रेरित केले.’ रायफलमॅन सिद्धांत छेत्री (२५) यांचा मृतदेहही दार्जिलिंगमधील किझोम बस्टी गावात आणण्यात आला. “आम्ही अजूनही विश्वास ठेवू शकत नाही की तो आता नाही. मात्र त्याने देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली, याचा आम्हाला अभिमान आहे,’ असे त्यांचे वडील खडका म्हणाले.

शुक्रवारी, चकमकीच्या काही तास आधीच पॅराट्रूपर प्रमोद नेगी (२५) हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमधील त्यांची आई तारा देवी यांच्याशी टेलिफोनवर होते. पण शनिवारी या माऊलीला तिरंग्यात लपेटलेल्या आपल्या लाडक्या लेकाला पाहावे लागले. त्याचे शव दिसताच या माऊलीने त्याला मिठी मारली.

प्रमोदचे वडील म्हणाले, “मला माझ्या मुलाचा अभिमान आहे, जो शहीद झाला.” हिमाचलच्या चमोली जिल्ह्यातील लान्स नाईक रुचिन सिंग रावत (३०) हे २००९मध्ये लष्करात दाखल झाले तेव्हा ते १७ वर्षांपेक्षा थोडेच मोठे होते. त्यांच्या पार्थिवाचे शनिवारी डेहराडून येथील जॉली ग्रँट विमानतळावर आगमन झाले. त्यांचे काका सुरेंद्र सिंग रावत म्हणाले, “आसाममध्ये २०१०मध्ये सेवा बजावत असताना कारवाईत मारल्या गेलेल्या आपल्या मामाच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वोच्च बलिदान देणारा रुचिन हा आमच्या कुटुंबातील दुसरा सदस्य आहे.”

हे ही वाचा:

पुतिन यांच्या पाठोपाठ या समर्थकावर प्राणघातक हल्ला, चालकाचा मृत्यू

एकलव्य खाडे, आर्यन सकपाळ यांनी ठोकली शतके

पोलिस उपायुक्ताच्या मुलाची हत्या मामेभावाने मालमत्तेसाठी केली!

काँगोमध्ये पुराचा हाहाकार , २०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती अनेक

दोन आठवड्यांपूर्वीच विवाह

पॅराट्रूपर सिद्धांत छेत्री (२४) यांचा दोन आठवड्यांपूर्वीच विवाह झाला होता. ते दार्जिलिंगमधील बिजानबारी गावाचे होते. त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रकाश छेत्री नुकतेच लष्करातून निवृत्त झाले आहेत. ‘माझा भाऊ २०२०मध्ये लष्करात दाखल झाला होता. त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला विशेष बलात सामील केले होते,’ असे ते म्हणाले.

Exit mobile version