इंदूरची सुदीप्ती हजेला, जयपूरची दिव्याकृती सिंह, मुंबईचे विपुल हृदय छेडा आणि कोलकात्याच्या अनुश अगरवाल यांनी आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. मात्र त्यामागे आहे, संघर्ष आणि त्याग. एक क्षण असाही आला की, घोडेस्वारांचा आशियाई गेम्समध्ये सहभाग घेणेही निश्चित नव्हते. जर घोडेस्वार न्यायालयात गेले नसते, तर कदाचित आशियाड खेळू शकले नसते. चीनने भारतातून त्यांचे स्वत:चे घोडे आणण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या घोडेस्वारांना दोन वर्षांहून अधिक काळ त्यांच्या घोड्यांसोबत युरोपमध्ये राहावे लागेल. शहरापासून दूर जंगलासारख्या ठिकाणी एकटं राहून त्यांना स्वत:ला स्वयंपाक बनवावा लागला आणि घोड्यांची सेवा करावी लागली. इतकेच नव्हे तर सुदीप्तीने जमीन गहाण टाकून ७५ लाखांचे कर्ज घेऊन घोडा खरेदी केला.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशात १२ वर्षीय मुलीवर बलात्कार
रुग्णालयाच्या निष्काळजीपणाचा फटका हवाई दल अधिकाऱ्याला; सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला १.५४ कोटींचा दंड
रायफल स्पर्धेत सिफ्ट कौर सामराची सुवर्ण, आशी चौक्सीची कांस्य पदकाला गवसणी
एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा
‘जर ते दिल्ली उच्च न्यायालयात गेले नसते, तर या संघाला आशियाड गेम्समध्ये भाग घेणे कठीण झाले असते. भारतीय घोडेस्वारी महासंघाने (ईएफआय) विनंती केल्यानंतरच घोडेस्वारांनी त्यांची केस मागे घेतली. त्यानंतर ईएफआयने मदतही केली,’ असे सुदीप्तीचे वडील मुकेश सांगतात. जेव्हा घोडेस्वारांना समजले की, त्यांना भारतामधून चीनमध्ये घोडे घेऊन जाण्याची परवानगी नाही, तेव्हा त्या सर्वांनी युरोपमध्ये तळ हलवण्याचा निर्णय घेतला. सुदीप्तीला पॅरिसपासून ५० किमी दूर असलेल्या पामफोऊ येथे पाठवले गेले. तिथे ती एकटीच राहात होती. सरावानंतर तिला स्वत:लाच स्वयंपाक बनवावा लागत होता. तसेच, घोड्याची काळजीही घ्यावी लागत होती. आशियाई खेळांसाठी चीनमधून घोडे पाठवण्यात आले होते. जर्मनीमध्ये सात दिवस त्यांना विलग ठेवण्यात आले होते.