26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेष‘इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा’

‘इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा’

इस्रायलच्या भारतातील वाणिज्य दूतांनी मोहम्मद झुबेरला फटकारले

Google News Follow

Related

‘इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा’, असे ट्वीट भारतामधील इस्रायलच्या वाणिज्य दूतावासातर्फे करण्यात आले आहे. आल्ट न्यूजचा संस्थापक मोहम्मद झुबेर याने खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हमासने दहशतवादी हल्ला केल्यानंतर इस्रायल त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत असतानाच हसामच्या समर्थक घटकांनी इस्रायलच्या विरुद्ध प्रचारास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सोमवारी इस्रायलचे भारतातील राजदूत कोब्बी शोशानी यांनी ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांना इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान खोट्या बातम्या आणि इस्रायलविरुद्ध द्वेष पसरवल्याबद्दल खडसावले. ‘मिस्टर झुबेर, इस्रायलबद्दल खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवणे थांबवा. तुम्ही स्वतःला खरेच तथ्य तपासणारे समजत असाल तर इस्रायलला जा,” असे राजदूतांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

काही हमास समर्थक घटकांनी इस्रायलचे पंतप्रधान आणि त्यांच्या समर्थकांचा क्रूरपणा सिद्ध करण्यासाठी काही छायाचित्रे सादर केली. तसेच, इस्रायलची लहान मुले, अर्भक यांच्या थंड रक्ताने केलेल्या हत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप इस्रायलने केला आहे. हे तथाकथित ‘फॅक्ट चेकर’ चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तत्पूर्वी परदेशी शोध पत्रकार आणि अमेरिकेतील रेअर फाउंडेशनच्या संस्थापक ऍमी मेक यांनीही भारतीयांना खोट्या बातम्या देणाऱ्या आल्ट न्यूज आणि तिचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेरबद्दल सतर्क राहण्याचे आवाहन केले. ‘मोहम्मद झुबेर नावाचा एक ‘जिहादी’, डाव्या विचारसरणीचे चुकीची माहिती देणारे ऑल्ट न्यूज पोर्टल चालवत आहे. ज्या व्यक्ती दहशतवादी संघटना हमासच्या प्रचाराचा पर्दाफाश करत आहेत, त्यांच्याविरुद्ध तो या पोर्टलद्वारे मोहीम राबवत आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.

हे ही वाचा:

महादेव बेटिंग ऍप प्रकरणी सौरभ चंद्राकरच्या निकटवर्तीयाला अटक

मुंबईतील सोने तस्करी करणाऱ्या टोळीचा डीआरआयकडून पर्दाफाश

पैसे घेऊन विचारले प्रश्न; खा. मोईत्रा यांच्यावर अदानी समूहाचे आरोप

“वेळापत्रक इतक्या दिवसात द्या अन् दोन महिन्यात निर्णय घ्या, असं आदेशात नाही”

आल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना लक्ष्य करून वाद निर्माण केल्याच्या घटनेचाही ठळकपणे उल्लेख केला. “नुपूर शर्मा यांनी केवळ सत्य सांगितले होते. त्यांनी प्रेषित मुहम्मद आणि त्यांची पत्नी आयशा यांच्या वयाबद्दल तथ्यात्मक माहिती दिली होती. लग्न झाले तेव्हा आयशा सहा वर्षांची होती आणि लग्न अधिकृत झाले तेव्हा ती नऊ वर्षांची होती,’ असे त्यांनी सांगितले होते. तसेच, झुबेर याला धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एकदा भारतीय तपास यंत्रणांनी अटकही केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा