21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषउत्तराखंड: हल्द्वानीमध्ये 'बेकायदेशीर' मदरसा पाडल्यानंतर दगडफेक, वाहने पेटवली!

उत्तराखंड: हल्द्वानीमध्ये ‘बेकायदेशीर’ मदरसा पाडल्यानंतर दगडफेक, वाहने पेटवली!

अनेक पोलीस, पत्रकार जखमी

Google News Follow

Related

उत्तराखंडमधील हल्दवानी शहरातील बेकायदेशीर मदरसा आणि मशीद पाडल्यानंतर प्रशासनाला स्थानिक लोकांचा सामना करावा लागला.संतप्त जमावाकडून दगडफेक आणि वाहने जाळण्यात आली आहेत.जाळपोळीच्या घटनेनंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून जिल्ह्यातील सर्व पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी आपल्या फौजफाटेसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (८ फेब्रुवारी) हल्दवानी शहरातील बनभूलपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मलिकच्या बागेतील बेकायदेशीर मदरसा आणि नमाजची जागा महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली.ही कारवाई करत असताना महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय, नगर दंडाधिकारी रिचा सिंग, एसडीएम परितोष वर्मा यांच्यासह पालिकेचे पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा:

‘आर्टिकल ३७०’ हटविल्याचा थरार लवकरच मोठ्या पडद्यावर!

भारत-म्यानमार देशाचा ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ करार अखेर रद्द!

चकमकफेम प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

आपकडून आसाममध्ये तीन उमेदवार जाहीर

बेकायदेशीर मदरसा व नमाजचे ठिकाण जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात येत असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी पोलिस प्रशासन आणि पत्रकारांवर दगडफेक केली.या दुर्घटनेत अनेक पोलीस कर्मचारी आणि पत्रकार जखमी झाले आहेत.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.जमावाने पोलिसांच्या गाड्यावर दगडफेक केली आणि पोलिसांच्या गाड्याही जाळल्या.पोलिसांनी अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागवण्यात आला आहे.

या प्रकरणी महापालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी सांगितले की, या ठिकाणी असणारा मदरसा आणि नमाजचे ठिकाण बेकायदेशीर होते त्यामुळे कारवाई करत ते जमीनदोस्त करण्यात आले.कारवाई दरम्यान जमावाने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर दगडफेक केली.हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या संदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा