‘३७० रद्द झाल्यापासून दगडफेक बंद’

‘३७० रद्द झाल्यापासून दगडफेक बंद’

Jammu and Kashmir, July 18 (ANI): Army jawans stand guard near the encounter site in the Amshipora area of Shopian on Saturday. Three militants killed in the encounter with security forces in Shopian. (ANI Photo)

जम्मूतील मौलाना आझाद स्टेडियमवर शनिवारी म्हणजेच उद्या सीआरपीएफच्या ८३ व्या स्थापना दिनाचा समारंभ होणार आहे. या समारंभाची तयारी सुरु आहे, समारंभाच्या आधी परेडचा सराव सुरु आहे. दिल्ली-एनसीआरच्या बाहेर प्रथमच हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्राचे गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

यावेळी समारंभाच्या आधी पार पडलेल्या परेडवेळी सीआरपीएफचे डीजी कुलदीप सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, ” सध्या जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती खूप चांगली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल नागरी अधिकाऱ्यांना मदत म्हणून काम करत आहे आणि स्थानिक सरकारलाही मदत करत आहे. परिस्थिती बरीच सुधारली आहे आणि आणखी सुधारत आहे. ”

केंद्रीय राखीव पोलीस दल प्रमुखांनी माहिती दिली की, २०१९ मध्ये कलम ३७० रद्द केल्यापासून, खोऱ्यात दगडफेकीच्या जवळपास कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच परदेशी दहशतवाद्यांनी देशात घुसखोरी करून हल्ले घडवण्याचे प्रमाणही कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. आपल्या जवानांच्या शौर्याचे आणि धैर्याचे कौतुक करताना, ते म्हणाले की, १ मार्च २०२१ ते १६ मार्च २०२२ पर्यंत सीआरपीएफ डीजीने जम्मू आणि काश्मीरमध्ये १७५ दहशतवाद्यांना निष्प्रभ केले आणि १८३ जणांना पकडले आणि ६९९ नक्षलवाद्यांना पकडले आहे. तसेच या वर्षभराच्या काळात ४१५ शस्त्रे, १३ हजार किलो  दारुगोळा, १ हजार ४०० किलो स्फोटके, २२५ ग्रेनेड, ११५ बॉम्ब, ६१५ आयईडी, २ हजार ४०० डिटोनेटर आणि ५ हजार ३३६ जिलेटिन काठ्या असा एकूण सुमारे ३.२७ कोटी २७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

काश्मीर फाईल्स चित्रपटचे यश सामान्य नागरिकांचे

पाकिस्तानने स्वतःवरच डागले क्षेपणास्त्र?

‘या’ देशाला दिली भारताने १ अब्ज डॉलरची मदत

या सर्व ऑपरेशन दरम्यान आपल्या लष्कराने १२ जण गमावले आहेत तर १६९ जण जखमी झाले आहेत, असे डीजी कुलदीप सिंग यांनी सांगितले आहे.

Exit mobile version