अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करण्याऱ्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये सप्टेंबर महिन्यात राडा झाला होता. या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे? अशा अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शरद पवार यांचा हात आहे, अशा चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत.या घटनेतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याला पोलिसांनी अटक केली.त्यांनतर भाजप आमदार नितेश राणे यांनी दगडफेक प्रकरणात अटक झालेला ऋषीकेश बेदरे आणि शरद पवारांचा एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो ट्वीट करताना दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून एक फोटो ट्विट करण्यात आला आहे.या फोटो मध्ये पोलिसांनी अटक केलेला अंतरवली सराटी येथील दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषीकेश बेदरे आणि राजेश टोपे हे आहेत, जे शरद पवार यांच्या बाजूला उभे आहेत.दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?असा सवाल देखील नितेश राणेंनी केला आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!
कोची विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!
तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!
पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!
नितेश राणेंनी ट्विट केले आहे की, दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?
अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
दरम्यान, अंतरवाली सराटीत जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जमध्ये अनेक मराठा आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले होते.या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. बेदरेच्या घरातून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसंही जप्त करण्यात आली आहेत.