मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गणपतीच्या आगमनावेळी दगडफेक !

आरोपीला अटक

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गणपतीच्या आगमनावेळी दगडफेक !

देशात मोठ्या उत्साहाने व आनंदाने श्री गणेशाचे काल (७ सप्टेंबर) आगमन झाले. एकीकडे आनंदोस्तव साजरा होता असताना दुसरीकडे दगडफेकीचे घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील रतलाममध्ये शनिवारी (७ सप्टेंबर) रात्री दगडफेकीची घटना घडली. श्री गणेशाच्या स्थापनेच्या मिरवणुकीत दोन पक्षांमध्ये वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर मिरवणुकीत फिरणाऱ्या तरुणांवर एका तरुणाने दगडफेक केली. या घटनेनंतर दोबत्ती पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमला. पोलीस ठाण्यात उपस्थित हिंदू संघटनांच्या लोकांनी दगडफेक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

मध्य प्रदेशच्या रतलाममधील मोचीपुरा येथील ही घटना आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस ठाण्याने दोबत्ती चौक आणि छत्रीपूर येथे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत जमावाला नियंत्रित केले. त्याचवेळी मोचीपुरा परिसरात संतप्त जमावाने अनेक मोटारसायकलींची तोडफोड केली. अनेक मोटारसायकली रस्त्यावर पडलेल्या दिसल्या.

रतलामचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी सांगितले की, रात्री एक वाजण्याच्या सुमारास परिस्थितीचा आढावा घेतला गेला आणि वादाची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून प्रकरण शांत केले. दगडफेक करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हिंदू जागरण मंचचे पदाधिकारी राजेश कटारिया यांनी सांगितले की, दगडफेकीच्या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बीजेपी नेता निर्मल कटारिया यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

हे ही वाचा :

भारताकडून झिम्बाब्वे, झांबियाला तांदूळ, मक्याची मदत !

वारीची परंपरा गढूळ करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हायलाच हवा !

जरांगेना आता भुजबळांकडून येवल्याचे निमंत्रण

चक्रव्यूह तोडता येईल का?

Exit mobile version