कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर असलेलं अतिक्रमण काढलं जावं यासाठी संभाजी राजेंसह राज्यातील असंख्य शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. अतिक्रमण हटवण्याच्या मागणीकरिता संभाजी राजे आज विशाळगडावर दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत हजारो शिवभक्त देखील आहेत. तत्पूर्वी गडावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशाळ गडावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे. स्थानिकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ देखील शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये परिसरात दगडपडल्याचे दिसत आहे. परिसरातील घरांवर दगडफेक झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. संभाजी राजेंना याबाबत विचारल असता ते म्हणाले अद्याप याबाबत माहिती नाही. प्रत्यक्ष पाहिल्यावरच याबाबत आपण बोलणार असल्याचे संभाजी राजेंनी सांगितले.
हे ही वाचा:
अंबानींच्या विवाह सोहळ्यात इंडी आघाडीचे वऱ्हाड
अंबानी पुत्राच्या शाही विवाहसोहळ्यात दोन संशयितांची घुसखोरी, दोघांवर गुन्हे दाखल
देशाला दिशा देण्याच्या कामात मीडियाचा महत्वाचा रोल!
दरम्यान, एकीकडे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीकरिता संभाजी राजे गडावर पोहचत आहेत. तर दुसरीकडे दगडफेकीची घटना घडली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशाल गडाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.