25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषराजस्थानच्या जहाजपुरमध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक

राजस्थानच्या जहाजपुरमध्ये हिंदूंच्या मिरवणुकीवर मुस्लीम समुदायाकडून दगडफेक

Google News Follow

Related

राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील जहाजपूर शहरात शनिवारी (१४ सप्टेंबर) संध्याकाळी एका हिंदू धार्मिक मिरवणुकीवर मुस्लिम समाजाने हल्ला केल्याची घटना घडली. जलझुलणी एकादशीनिमित्त गावातील हिंदू समुदायाने मिरवणूक काढली होती. जामा मशिदीत पोहोचल्यावर सुमारे २०-२५ मिनिटे मशिदीच्या आतून हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात अनेक भाविक जखमी झाले. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली आणि बाजार बंद ठेवावा लागला.

त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या हिंदूंनी दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलन सुरू केले. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपचे आमदार (जहाजपूर मतदारसंघ) गोपीचंद मीणा हिंदू समाजाच्या आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी तिथे धरणे आंदोलन केले.

हेही वाचा..

राजगुरूनगरमध्ये एकवटला सकल हिंदू समाज

ख्रिश्चन धर्मीयांकडून गणपती विसर्जनाच्या वाटेत ‘मिरचीची धुरी’

सत्ता आल्यास एक तासात दारूबंदी रद्द करणार

‘क्रिकेटचा फिवर शरीयाच्या विरोधात, तालीबान्यांकडून क्रिकेट बंदीची शक्यता’

दरम्यान, नगरपालिकेने जामा मशिदीच्या प्रमुखाला नोटीस बजावून २४ तासांच्या आत जमिनीची मालकी, बांधकाम आणि भाडेपट्ट्याशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दगडफेकीप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांची आता चौकशी सुरू आहे. जहाजपूरमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे

शनिवारी (१४ सप्टेंबर) रात्री महापालिकेने जहाजपूर बसस्थानकाजवळील मुस्लिम समाजाचे अवैध अतिक्रमण हटवले. जिल्हाधिकारी राजेंद्रसिंह शेखावत यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. दगडफेकीच्या प्रकरणी १० आरोपींच्या अटकेनंतर, भाजपचे आमदार गोपीचंद मीणा यांनी हिंदूंना निदर्शने संपवण्याचे आवाहन केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा