सोमवारी ग्लोबल मार्केट, विशेषतः आशियाई शेअर बाजारांमध्ये घसरण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या वादग्रस्त टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, जगभरातील नेते ‘परस्पर करार’ (रेसिप्रोकल टॅरिफ) करण्यासाठी उतावळे झाले आहेत. सोमवारी आशियाई बाजारांची सुरुवात मोठ्या घसरणीने झाली. मात्र ट्रम्प यांनी या चिंतेला सौम्य करण्याचा प्रयत्न केला आणि सूचित केले की त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे बाजारात जो अस्थिरपणा निर्माण झाला आहे, तो दीर्घकालीन व्यापार असमतोल सुधारण्यासाठी आवश्यक असलेले एक औषध असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाजारातील चढ-उतारांचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, कधी कधी एखादी गोष्ट बरी करण्यासाठी औषध घ्यावे लागते. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी वीकेंडमध्ये अनेक जागतिक नेत्यांशी संपर्क साधला आणि अनेक देश करार करण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा केला. जगभरातील बाजारात मोठ्या नुकसानीनंतरही ट्रम्प प्रशासन त्यांच्या आक्रमक टॅरिफ धोरणातून मागे हटण्याचे कोणतेही संकेत देत नाही. ते म्हणाले, बाजारांचे काय होईल हे मला सांगता येणार नाही. पण आपला देश निश्चितच अधिक मजबूत आहे.
हेही वाचा..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाबाबत व्यक्त केली चिंता
वक्फ विधेयकाचे समर्थन केले, भाजपा नेत्याचे घर पेटवले
भूकंपापूर्वीच इशारा देईल ‘भूदेव’ अॅप
सपा नेता विनय तिवारींच्या कंपनीत भ्रष्टाचाराची ‘गंगोत्री’; ईडीचे छापे!
दरम्यान, ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला प्रत्युत्तर म्हणून चीनने विशेष कारवाईची घोषणा केली आहे. त्यामुळे व्यापारयुद्ध तीव्र होण्याची चिंता वाढली आहे. अर्थतज्ज्ञांनी इशारा दिला की, जर अमेरिका सध्याच्याच मार्गावर चालू राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेला गंभीर मंदीचा सामना करावा लागू शकतो. जेपी मॉर्गनचे मुख्य अर्थतज्ज्ञ ब्रूस कासमॅन यांनी मंदीचा धोका ६० टक्के असल्याचे सांगितले आहे. बाजारातील गोंधळाची तुलना तज्ज्ञ १९८७ च्या ‘ब्लॅक मंडे’ क्रॅशशी करत आहेत. तेव्हा जागतिक बाजारांनी एका दिवसात तब्बल १.७१ ट्रिलियन डॉलर्स गमावले होते. सीएनबीसीचे जिम क्रॅमर यांनी इशारा दिला की, जर ट्रम्प यांचे व्यापार धोरण असेच सुरू राहिले, तर बाजार अशाच भयावह घटनेला सामोरे जाऊ शकतात. सध्या बाजार आणखी एका अस्थिर आठवड्यासाठी सज्ज आहे. सर्वांच्या नजरा व्हाइट हाउसकडे आणि सुरू असलेल्या व्यापार संघर्षात पुढील पावलांवर केंद्रित झाल्या आहेत.