इलेक्ट्रिक वाहनांचे आवाहन; पण खर्च पेट्रोल-डिझेलवरच

इलेक्ट्रिक वाहनांचे आवाहन; पण खर्च पेट्रोल-डिझेलवरच

“पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहने (E.V.) ही काळाची गरज असून नागरिकांनी पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले खरे परंतु दिव्याखाली अंधार म्हणतात अगदी तसेच झालेले आहे. असे आवाहन करूनही पालिकेच्या ताफ्यात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांवर करोडोंचा चुराडा होत आहे.

महापालिकेमधील राजकीय पदाधिकारी तसेच इतर अधिकारी यांच्यावर नुकताच करोडोंचा पेट्रोल डिझेल वाहनांवर कोटींचा चुराडा झालेला आहे. तब्बल २ कोटी ७६ लाख ९९ हजारांचा चुराडा करून आधीच झालेला आहे. तसेच लवकरच अजून गाड्या दाखल करण्याचा विचारही आहे.

सध्या पालिकेच्या ताफ्यात गाड्या आहेत, परंतु त्यात बिघाड होत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. वारंवार या गाड्यांमध्ये बिघाड होत असल्याने पालिकेकडून नवीन गाड्या खऱेदी करण्यात येत आहे असे पालिकेचे म्हणणे होते. म्हणूनच पालिकेने २४ जुन्या गाड्या काढून त्याजागी नवीन पेट्रोल डिझेलवरील गाड्या खरेदी केल्या. महिन्याभरापूर्वीच महिन्द्राच्या गाड्यांची खरेदी ७ लाख १० हजार रुपयांना करण्यात आली होती. अशा तब्बल ११ जीप खरेदी करण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे पालिकेच्या ताफ्यात सध्याच्या घडीला ९६६ वाहने आहेत.

हे ही वाचा:

मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन

‘त्या’ अत्याचाराच्या व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या हाती!

६५ तासांमध्ये मोदींनी उरकल्या २० बैठका!

बापरे! श्वानाच्या श्वसननलिकेत अडकली होती गोटी…

यातील केवळ ५ वाहने इलेक्ट्रीक आहेत. त्याही केंद्र सरकारच्या अखत्यारितील एनर्जी एफिशिएन्सी सर्विसेस या कंपनीकडून ड्राय लीज पद्धतीवर खरेदी केलेल्या आहेत. पाचपैकी एक इलेक्ट्रीक वाहन महोपौरांच्या ताफ्यात आहे. त्यामुळे आता निव्वळ पोकळ घोषणा आणि अंमलबजावणी शून्य याचाच प्रत्यय पालिकेच्या कारभारामुळे येत आहे.

Exit mobile version