ताठरपणा गेला, चेहऱ्यावर तणाव, सीबीआयच्या ताब्यात येताच शाहजहान शेखचे बदलले हावभाव!

सीबीआयकडून कसून चौकशी

ताठरपणा गेला, चेहऱ्यावर तणाव, सीबीआयच्या ताब्यात येताच शाहजहान शेखचे बदलले हावभाव!

संदेशखाली प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहजहान शेखची बंगाल पोलिसांकडून सुटका करून आता सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे.संदेशखाली येथील महिलांच्या लैंगिक छळा प्रकरणी आणि ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सीबीआय शाहजहान शेखची चौकशी करत आहे.रविवारी (१० मार्च) सीबीआयने शेखला बशीरहाट न्यायालयात हजर केले होते.त्यावेळी न्यायालयाने त्याची चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसात शेख याचे हावभाव बदलले आहेत.शाहजहान शेखला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता.शेख याचा ११ दिवसांपूर्वीचा अहंकार आता पूर्णपणे नाहीसा झालेला दिसत होता.चार दिवसांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या आदेशानंतर बंगालच्या सीआयडी पथकाने संदेशखाली प्रकरणाची कागदपत्रे आणि शाहजहान शेखला सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

हे ही वाचा:

राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार, माजी मंत्र्यांसह ३२ जणांचा भाजपात प्रवेश!

एवढ्याशा कारणामुळे तिने त्या पुरुषाच्या कानाचा लचका तोडला…

युसुफ पठाण तृणमूलमधून लढणार लोकसभा!

जुनागडमधील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त

दरम्यान, सीबीआयने शेखला कोर्टात हजर करत असताना त्याच्या बोलण्यात कमालीचा बदल जाणवला.त्याच्या चेहऱ्यावर तणाव, नम्रता आणि अहंकार पूर्णपणे मावळलेला दिसत होता.शाहजहानच्या वागणुकीत हा बदल त्याच्या नजरकैदेवर प्रकाश टाकतो.विशेषतः शेखला अटक केल्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करत असताना तेव्हा तो निर्भयपणे आणि आत्मविश्वास असल्यासारखा दिसत होता.मात्र, आज शेखला पाहिले असता त्याचा ताठरपणा गेल्याचा आणि चेहऱ्यावर तणाव असल्याचा दिसत होता.

Exit mobile version