दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!

भाजपा नेते आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला

दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा!

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे कालच्या भाषणात म्हणाले होते. जर असा कोणी प्रयत्न केला तर त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शिवसैनिक प्रमुखांनी दिलेली शिकवण आणि आदेश असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत टीकाही केली. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या मुंबई तोडण्याच्या भाषेवरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी त्यांना टोला लगावला आहे. ‘उबाठाची ही फेमस जुनी टेप असून मुंबई स्वतःच स्वतःशी लाजली,’ असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

आशिष शेलार ट्वीटकरत म्हणाले, ‘मुंबई तोडणार..मुंबईला तोडणार..’ उबाठाची ही जुनी फेमस टेप कधी वाजणार ? आतुरतेने वाट पाहत होते मुंबईकर अखेर काल ही “टेप” वाजली. मुंबई स्वतःच स्वतःशी लाजली. महाराष्ट्रात निवडणूक आहे हे काल समजली.

हे ही वाचा : 

मणिपूर हिंसाचारात एक आंदोलक ठार, जमावाकडून भाजप-काँग्रेस कार्यालयांची तोडफोड!

ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!

इस्रायलकडून हिजबुल्लाच्या मीडिया संबंध प्रमुखाचा खात्मा

दिल्लीत प्रदूषणाची पातळी ‘गंभीर’; ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू

ते पुढे म्हणाले, नखं वाढतात हे मला माहीत होते.. केस वाढतात हे सुध्दा माहीत होते.. पण जीडीपी कसा वाढतो हे माहीत नाही… हे ज्ञानवर्धक विधान सुध्दा ऐकले मुंबईकरांनी… माजी मुख्यमंत्र्यांचे पाहून हे अगाध ज्ञान.. महाराष्ट्र काल झाला पुन्हा हैराण.

काय म्हणावे यांच्या विनोदाला? काय म्हणावे या स्थितीला ? काय म्हणावे या व्यक्तीला ? काय म्हणावे यांच्या नीतीला? दिल्या घरी सुखी रहा, स्वतःच्या जुन्या कॅसेट स्वतः ऐकत बसा. उबाठाच्या भाषणापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रचारसभेचा आजचा शेवटचा दिवस असून २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.

 

Exit mobile version