कोरोना काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार

कोरोना काळात विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी अशी घोषणा केली आहे. कोरोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये राज्यातील अनेक विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, या दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अडथळे निर्माण होत आहेत. याचा गांभीर्याने विचार करत राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना पासपोर्ट मिळवण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचण होत आहे. त्यामुळे अंमलबजावणीसाठी गृह खात्याने राज्यांतील १८८ अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांची माहिती मागवली आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचे नेते मेमन म्हणतात, मोदींच कौतुक करायलाच हवं

हिंदू अल्पसंख्याक प्रकरणाचे शपथपत्रच सॉलिसिटर जनरलनी पाहिले नाही

उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान

भाजपाचा विजय साजरा करणाऱ्या मुस्लिम युवकाला उत्तर प्रदेशात केले ठार!

साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत सूचना देऊनही अनेक जण नियमांचे उल्लंघन करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते. मात्र, या दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे आता विद्यर्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भविष्याचा प्रश्न उपस्थित झाला असून याची दखल आता राज्य सरकारने घेतली आहे. त्यानुसार दिलीप वळसे पाटील यांनी कोरोना कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवर कलम १८८ अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे गृह विभाग मागे घेणार असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version