ठाकरे, पवार, पटोले नाक घासून माफी मागा!

भाजपातर्फे महाराष्ट्रात आंदोलने

ठाकरे, पवार, पटोले नाक घासून माफी मागा!

कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले व मविआने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल दिला होता.त्यानंतर आज राज्यभरातून ठिकठिकाणी उद्धव ठाकरे, शरद पवार व नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

 

कंत्राटी भरतीची सुरुवात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांच्या काळातच सुरुवात झाल्याचा दाखला फडणवीस यांनी सादर केला. सत्ताधारी पक्ष सर्व स्तरावर कंत्राटी भरती करत असल्याचा आरोप करत होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कंत्राटी भरतीची सुरुवात कोणाचा काळात झाली तसेच कंत्राटी भरतीला आदेश कोणी दिले याची सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा खुलासा करत विरोधकांना तोंडावर पाडले. विरोधक तरुणांना कसे फसवत आहेत हे फडणवीस यांनी जनतेसमोर दाखवून दिले.

 

कंत्राटी भरतीबाबत तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महाराष्ट्राच्या जनतेची नाक घासून माफी मागा अन्यथा आंदोलन करू असा इशारा बावनकुळे यांनी दिल्यानंतर आज संपूर्ण मुंबईत महाविकास आघाडीविरोधात निषेध मोर्चे काढण्यात आले.

हे ही वाचा.. 

बोरीवली पूर्वला श्री महालक्ष्मी पूजा उत्साहात

मॅनहोल साफ करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला ३० लाखांची भरपाई द्या!

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

कंत्राटी भरतीने नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला!

मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्याकडून आंदोलन करण्यात आले.’नको खोटी भाषा, गुंडाळा शरद पवारांचा गाशा…आपला नातू तुपाशी दुसऱ्यांची पोरं उपाशी…विरोधकांची हुलाहुल, विद्यार्थ्यांची दिशाभूल’ अश्या घोषणा देत कंत्राटी नोकर भरतीतून लाखो तरुणांची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ मुंबई भाजपच्या वतीने महाविकास आघाडीविरोधात ‘नाक घासो’ आंदोलन करण्यात आले. कंत्राटी भरतीचा निर्णय हा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि तत्कालीन कॉंग्रेस सरकारचा असल्याचा आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी केला.

 

मुंबईत गिरगाव येथे झालेल्या आंदोलनात विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर उपस्थित होते.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंत्राटी नोकर भरती बाबत महाराष्ट्रच्या जनतेची दिशाभूल केल्या नंतर शरद पवार,उद्धाव ठाकरे, नाना पटोले यांनी माफी मागावी यासाठी नाशिक मध्ये सह जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडून आंदोलन करण्यात आले.

Exit mobile version