एसटी महामंडळातील जुन्या भंगार खिळखिळ्या गाड्यांच्या ऐवजी लवकरच आता रस्त्यावर नवीन गाड्या धावताना दिसणार आहेत. खासगी भाडेतत्वावर ५०० बसेस तर एसटी महामंडळाच्या मालकीच्या ७०० अशा एकूण १२०० बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यापैकी ५०० बसेसची ई निविदा प्रक्रिया सोमवार पासून सुरू होणार आहे. एकूणच काय तर, एसटी तोट्यात असतानाही बस घेण्याचा घाट प्रशासनाने घातलेला आहे.
त्यामुळेच आता एसटीतील संघटनांनीच याला विरोध केला आहे. कोरोना काळात एसटी महामंडळाची स्थिती फारशी चांगली नसताना, या भाडेतत्वावरील बस घेणे म्हणजे निव्वळ उधळपट्टी असल्याची टीका केली जात आहे. एकीकडे एसटी कर्मचारी वर्ग आजही वेळेवर पगार होत नाही म्हणून संतप्त आहे. त्यात ही उधळपट्टी कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भाडेतत्वावर इतक्या बसेस का असा प्रश्नच त्यामुळे आता एसटी महामंडळातील कर्मचारी मंडळी विचारत आहेत. सध्याच्या घडीला एसटीच्या ताफ्यात तब्बल १६ हजार ५०० बस असून यामध्ये साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या व भाडेतत्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाड्या आहेत. त्यातच आता प्रशासनाने राज्यातील तब्बल सात विभागांसाठी भाडेतत्वावर साध्या बस आठ वर्षांकरता घेण्याचे ठरवले आहे. याकरता आता निविदा काढण्याचीही तयारी झालेली आहे. त्याकरताच एसटी महामंडळाकडन आता इ निविदांसाठी बैठकीचे आयोजन येत्या १७ तारखेला करण्यात आलेले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये मुसलमानांनी पुन्हा मंदिर उध्वस्त केले
आयएनएस विक्रांतवर यशस्वीरित्या उतरवले हेलिकॉप्टर
राज्याच्या खजिन्यात जमा झाला इतका जीएसटी
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला अमित शहांचा बूस्टर
राज्यभरातील ७ विभागाकरिता या खासगी भाडेतत्वावरील ५०० बसेसचा वापर केला जाणार आहे. तर ७ वर्षांकरिता या बसेसचा एसटीच्या ताफ्यात वापर केला जाणार असल्याचे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले आहे.