24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषएसटीचा प्रवास डबघाईस; तोटा ५६०० कोटींवर

एसटीचा प्रवास डबघाईस; तोटा ५६०० कोटींवर

Google News Follow

Related

कोरोना निर्बंधांमुळे एसटीची अवस्था डबघाईला आलेली आहे. सद्यस्थितीला एसटीचा एकूण तोटा हा ५ हजार ६०० कोटींपर्यंत गेलेला आहे. तसेच कर्मचारी वर्गाला आजही वेतन वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. एवढेच नाहीतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ६०० कोटींची मदत जाहीर केली. परंतु केवळ ३०० कोटींचा पहिला हप्ता महामंडळाला मिळालेला आहे.

अदयाप जूनचा पगार एसटी कर्मचारी वर्गाला मिळाला नाही. त्यामुळे कर्मचारी हतबल झालेला आहे. एसटी महामंडळाची सद्यस्थिती अतिशय बिकट आहे. मागील वर्षी एसटीच्या कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे पगार थकले होते. दोन कर्मचाऱ्यांनी शेवटी आत्महत्येचा मार्ग अवलंबिला. करोना सुरू झाल्यापासून एसटीच्या उत्पन्नाला मोठा फटका सहन करावा लागत आहे. साथीच्या सुरूवातीपासूनच एस.टी.चे कर्मचारी सोयीसुविधांचा विचार न करता अत्यावश्यक सेवा म्हणून अहोरात्र काम करीत आहेत. करोना काळात एसटीत काम करीत असतांना ७५०० कर्मचारी करोना बाधित झाले आहे. यात १९८ कर्मचारी मृत झालेले आहेत. कर्मचारी जीवावर उदार होऊन आपली सेवा बजावत आहेत. त्यांना त्यांचे वेतन व इतर आर्थिक बाबी वेळेत मिळणे आवश्यक आहे. महामंडळ प्रचंड आर्थिक अडचणीत असल्यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर खर्चासाठी शासनाकडे २ हजार कोटींची मागणी केली होती. भविष्यकाळात एस. टी. कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे अडचणीचे होणार आहे.

हे ही वाचा:

घरे पडल्याची बातमी कळताच मंगल प्रभात लोढा धावले

भारतीय नौदलाच्या ताफ्यात अमेरिकेची एमएच-६०आर हेलिकॉप्टर्स दाखल

विकिपीडियावर विश्वास ठेवू नका…साईटवर डाव्यांचा कब्जा

गर्दीसाठीही आता केंद्रच जबाबदार?

मागील लॉकडाउनच्या कालावधीत एस.टी.कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाने पुढाकार घेऊन, आर्थिक सहाय्य दिले. राज्य शासनाने मार्च २०२१ पर्यंतच्या वेतनासाठी १००० कोटींचे विशेष पॅकेज महामंडळास देऊन कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण दूर केलेली होती. हे पॅकेज मिळाले नसते तर, कर्मचाऱ्यांना काम करूनही वेतन मिळाले नसते.

कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बस काही काळासाठी बंद होत्या. त्यामुळे जवळपास २ हजार ७५० कोटींचे एसटीचे उत्पन्न बुडालेले आहे. सध्या उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीचा वापर मालवाहतुकीसाठी करावा लागतो आहे. ११०० वाहनांचे रूपांतर मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये करण्यात आले आहे. ही संख्या लवकरच दुप्पट करण्यात येणार आहे. पण तिकीट वाढीचा कोणताही विचार नाही. मात्र तिकिटांची किंमत वाढवूनही एसटीला या कर्जाच्या दलदलीतून बाहेर काढणे कठीणच आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा