नागपूर आणि औरंगाबाद येथील एसटी प्रेमींसाठी खुशखबर. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जायचेय. मग वाट काय पाहताय. एसटीची रात्रीचे जेवण करायचे आणि छान झोप काढून सकाळी शिर्डीत दाखल व्हायचे ते ही अगदी विक्रमी वेळेत. हे शक्य झालेय ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मार्गाला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर लगेच या मार्गाचा वापरही सुरू झाला. समृद्धी महामार्गावर एसटी धावण्यासाठी सज्ज झाली आहे. गुरुवारी, १५ डिसेंबरुपासून आपली लालपरी या मार्गावर मोठ्या दिमाखात धावताना दिसणार आहे. नागपूर आणि औरंगाबाद या स्थानकातून दररोज शिर्डीसाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे.
नागपूर-शिर्डी या प्रवासासाठी ७ ते ९ तास एवढा वेळ खर्चिक व्हायचा. आता हे अंतर अवघ्या पाच तासात पूर्ण करता येणार आहे. यामुळे इंधन खर्चातही कपात होणार आहे. साहजिकच इंधनावरील हजारोंचा खर्च कमी होणार आहे. हा एवढा सगळा जमा खर्च लक्षात घेता याचा लाभ घेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानेही बससेवा या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने या महामार्गावरून नागपूर- शिर्डी विना वातानुकुलीत बस सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशपेठ बसस्थनकावरून रोज रात्री ९ वाजता ही बस निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता शिर्डीत दाखल होईल. अशाच प्रकारे दररोज रात्री ९ वाजता शिर्डीतीन एक बस निघेल आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
हेही वाचा :
क्रोएशियावर एकतर्फी विजय मिळवून मेस्सीचा अर्जेंटिना अंतिम फेरीत
‘अरुणाचल प्रदेश संघर्षात भारताने परिस्थिती व्यवस्थित हाताळली’
पुणे बंदमुळे व्यावसायिकांना बसला मोठा फटका; ३३ कोटींची बसली झळ
‘स्टार’ कासवांची तस्करी उधळली; एकाला अटक
तसेच समृध्दी महामार्गावरुन नागपूर औरंगाबाद ही नवी बससेवाही सुरू करण्यात आली आहे. औरंगाबादहून रात्री १० वाजता बस सुटेल आणि सकाळी ५.३० वाजता शिर्डीत पोहोचेल. नागपूरहूनही ही बस रात्री १० वाजता सुटेल आणि औरंगाबादला सकाळी ५.३० वाजता पोहोचणार आहे. पूर्वी एसटी बसने नागपूर-औरंगाबाद अंतर कापण्यासाठी जवळपास १३ तास लागायचे. पण आता हा प्रवास केवळ सहा ते सात तासांत पूर्ण होणार आहे. ही बसदेखील १५ डिसेंबरपासून सुरु होणार असून ही बस औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक येथून सुटणाऱ्या बसला केवळ सिडको बसस्थानक व जालना बसस्थानक असे दोन थांबे असणार आहेत.