महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्या महाराष्ट्रातील शूर सुपुत्रांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. अशा शूरवीरांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शतजन्म शोधितांना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदर राहुल शेवाळे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सचिव विकास खडगे उपस्थित होते.
हे ही वाचा:
मोदींची झळाळी आणि अपशकुनी दिवाभीतांचे टोळके…
नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए… पंतप्रधान मोदींनी दिला नवा मंत्र
मणिपूरमधील हिंसाचारात ४० दहशतवादी ठार
शिक्षणविरोधी तालिबानच्या नाकावर टिच्चून ती झाली आयआयटी पदवीधर
महाराष्ट्र सरकारने यापुढे २८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा दिवस गौरव दिवसाच्या रूपात साजरा करण्याचा निर्णयही घेतला आहे. याअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये स्वातंत्र्यसेनानींचे बलिदान, त्यांचा त्याग, त्यांची प्रखर देशभक्ती यावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, काही लोक जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीरांचा अपमान करतात. खरे तर, सावरकरांनी जन्मठेपेच्या शिक्षेदरम्यान अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या, मरण यातना भोगल्या पण तरीही त्यांना देशभक्तीबाबत कधीही तडजोड केली नाही.
सावरकरांना दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याचाच अर्थ इंग्रजांना त्यांच्यापासून भय होते. देशाच्या स्वातंत्र्याला आज ७५ वर्षे लोटली आणि स्वातंत्र्यवीरांना जाऊन आज ५७ वर्षे झाली तरी विरोधकांमध्ये त्यांच्याबद्दल अजूनही भीती आहे. कारण सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचू लागले तर आपले बिंग फुटेल अशी ही भीती आहे.