24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष'स्टारबक्स'च्या त्या नव्या जाहिरातीने ओढवला वाद; बहिष्कार ट्रेंडिंगमध्ये

‘स्टारबक्स’च्या त्या नव्या जाहिरातीने ओढवला वाद; बहिष्कार ट्रेंडिंगमध्ये

Google News Follow

Related

मल्टीनॅशनल कॉफी शॉप्सची साखळी चालवणाऱ्या स्टारबक्स कंपनीच्या नव्या जाहिरातीवरून वादाचे मोहोळ उठले आहे. त्यामुळे ट्विटरवर #बॉयकॉटस्टारबक्स हा हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे.

स्टारबक्सची नवी जाहिरात ही पारलिंगी व्यक्तींच्या हक्काभोवती केंद्रीत आहे. ‘तुमच्या नावापासून याची सुरुवात होते’, अशा टॅगलाइनने ही जाहिरात आणली आहे. एका मुलाने स्वत:चे पुरुषत्व झुगारून स्त्रीची ओळख धारण केली आहे आणि वडील ते खुल्या दिलाने स्वीकारत आहे, असे या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहेत. या जाहिरातीमुळे इंटरनेटवर दोन गट निर्माण झाले आहेत. काही गटाने या जाहिरातीचे स्वागत करत ही अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी जाहिरात असल्याचे म्हटले आहे. तर, काहींना ही जाहिरात अजिबातच न आवडल्याने त्यांनी बॉयकॉटस्टारबक्स असा हॅशटॅग व्हायरल केला आहे.

जाहिरातीच्या सुरुवातीला स्टारबक्सच्या कॉफीशॉपमध्ये एक स्त्री आणि पुरुष बसलेले दाखवत आहेत. हे दोघे त्यांचा मुलगा अर्पित याची वाट पाहताना दिसत आहेत. तो अद्याप न आल्याने वडिलांनी त्याला फोनही केला आहे. मात्र त्याने तो उचललेला नाही. इतक्यात एक मुलगी कॉफी शॉपमध्ये दाखल होते आणि या जोडप्याला भेटते. ही मुलगी खरे तर त्यांचा मुलगा असतो. ज्याने स्वत:ची ओळख बदलून नावही अर्पिता केलेले असते. ही मुलगी आणि आईही वडील ही बाब कसे स्वीकारतील, या चिंतेत असताना वडील कॉफी आणायला उठतात आणि अर्पिता नावाने त्यांची ऑर्डर बुक करतात. सुरुवातीला विरोध करणारे वडील त्यांच्या या मुलाची ‘अर्पिता’ ही नवी ओळख स्वीकारत आहेत, असे या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, काँग्रेस आघाडीवर

फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!

ट्विटरला मिळाली नवी सीईओ लिंडा याकारिनो

केरळ स्टोरीवर पश्चिम बंगालमध्ये बंदी का? सुप्रीम कोर्टाचा सवाल

‘तुमचे नाव ही तुमची ओळख आहे- ते अर्पित असो अथवा अर्पिता. तुम्ही जो कोण असाल, त्यांना स्टारबक्समध्ये तेवढेच प्रेम मिळेल आणि तुम्हाला स्वीकारले जाईल. कारण तुम्ही तुमची ओळख जपणे हेच आमच्यासाठी सारे काही आहे,’ अशी ओळ स्टारबक्स इंडियाने ट्विटरवर दिली आहे.

साहजिकच ही जाहिरात ट्विटरवर व्हायरल झाली असून सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या जाहिरातीचे स्वागत केले आहे तर काहींनी विरोध करत ‘आम्ही आमचे प्रश्न सोडवू, तुम्ही तुमची कॉफी विकण्याचा व्यवसाय सांभाळा,’ असा सल्ला दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा