दागिन्यांच्या जाहिरातींसाठी नवीन सेलिब्रिटी मिळवण्यात कंपन्यांच्या नाकी नऊ!

सेलिब्रिटींनी वाढवलेले दर आणि कठोर अटीशर्तींचा परिणाम

दागिन्यांच्या जाहिरातींसाठी नवीन सेलिब्रिटी मिळवण्यात कंपन्यांच्या नाकी नऊ!

सुप्रसिद्ध दागिन्यांच्या ब्रँड्सना नवीन सेलिब्रिटींची जाहिराती मिळवण्यात अडचणी येत आहेत. सेलिब्रेटींनी वाढवलेले दर आणि त्यांच्या जाचक अटीशर्तींमुळे त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. ही परिस्थिती स्थानिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही स्तरांवर आहे.एका ज्वेलरी ब्रँडच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर काही माहिती दिली. हे मोठमोठे स्टार एका दिवसासाठी तब्बल आठ कोटी रुपये मागतात. ही रक्कम आमच्या व्यवसायासाठी आता अव्यवहार्य ठरत आहे.

इतकी मोठी रक्कम देऊनही काही स्टार ते त्यांच्या ब्रँडच्या जाहिरातींसाठी वर्षातून तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस देण्यासही तयार होत नाहीत. ते दिवसभराच्या शूटिंगदरम्यान दिवसातून दोनवेळा कपडे बदलण्यासाठीही तयार नसतात. शिवाय, ते दिवसातून आठ तासांपेक्षा काम करण्यासही तयार नसतात. त्यात वाहतूककोंडीतील वेळही धरलेला असतो, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

अल्लू अर्जुन काही वर्षांपूर्वी ३५ लाख रुपये आकारत असे. पुष्पाच्या उदंड यशानंतर तो आता सहा कोटी रुपये दर लावतो. माधुरी दीक्षित आठ तासांसाठी एक कोटी रुपये घेते. तर, किआरा अडवाणी प्रत्येक दिवसासाठी फोटोशूट, दुकानांचे उद्घाटन आणि ब्रँडशी संबंधित कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी दर दिवसाला दीड ते दोन कोटी रुपये घेते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.‘गेल्या आठ वर्षांपासून काजोल आमच्या ज्वेलरी ब्रँडची ब्रँड ऍम्बेसेडर आहे. आम्ही आता नव्या चेहऱ्याच्या शोधात आहोत. मात्र प्रत्येक ज्वेलरने दुसऱ्या कोणाला किंवा नव्या अभिनेत्यांना घेतले आहे,’ असे जॉयलुकासच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख अनिश वर्गीझ यांनी सांगितले.

हे ही वाचा.. 

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या स्थानकाचाही कायापालट

उत्तराखंडमध्ये निर्माणाआधीच बोगदा कोसळला, ३६ जण अडकल्याची भीती!

भारतात पाचपैकी चार अवयवदात्या महिला!

हैदराबाद येथील एका निवासी इमारतीला आग, ६ जणांचा मृत्यू!
दाक्षिणात्य अभिनेत्यांची चलती
मलाबार गोल्ड आणि डायमंड यांनी यंदा आलिया भट्ट, ज्युनिअर एनटीआर, अनिल कपूर, करीना कपूर खन आणि तमिळमध्ये लोकप्रिय असलेला कार्तिक शिवकुमार यांना करारबद्ध केले आहे. आलिया भट्ट त्यांच्याशी पहिल्यांदाच जोडली गेली आहे. तर, ज्युनिअर एनटीआरसोबत कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मिया बाय तनिष्कने अभिनेत्री रकुल प्रीतला करारबद्ध केले आहे. तर, झोया ज्वेलस्ने सोनम कपूर अहुजाला करारबद्ध केले आहे. तर, तनिष्कने नवीन ब्रँड एम्बेसेडर म्हणून दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिला करारबद्ध करण्यात आले आहे. त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असला तरी तिने यासाठी पाच कोटी रुपये किंमत आकारल्याचे सांगितले जात आहे. दाक्षिणात्य चित्रपटअभिनेत्यांच्या वाढती लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशा प्रकारच्या ब्रँडच्या करारासाठी त्यांच्या फीमध्ये सन २०२१च्या दराच्या तुलनेत आठपट वाढ केल्याचे सांगितले जाते.

Exit mobile version