टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना आणखी एका विमान कंपनीकडून मोफत विमानप्रवाससाची ऑफर देण्यात आली आहे. ही घोषणा करताना विमान कंपनीने अतिशय अभिमान वाटत असल्याची भावना देखील व्यक्त केली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेल्या खेळाडूंना गो एअर या विमान कंपनीने मोफत विमान प्रवासाची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ आता स्टार एअर या विमान कंपनीने देखील मोफत विमान प्रवास करू देण्याची घोषणा केली आहे.
हे ही वाचा:
१५ वर्षांच्या मुलीने का केली आईची हत्या?
एल्गार परिषदप्रकरणी १५ जणांविरूद्ध आरोपपत्र
तृणमूलकडून बलात्काराचा राजकीय वापर
अबब!! त्यांनी घातला अडीच लाखांचा घोळ
स्टार एअरचे संचालक संजय घोडावत यांनी म्हटले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या पदक विजेत्यांनी ऐतिहासिक विजयांनी भारताला जगासोबत जोडले आहे. अशा वेळेस स्टार एअरला त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरवताना अतिशय अभिमान वाटत आहे. आम्ही भारतातील सर्वात नवी विमान कंपनी आहोत. या खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकमधील विजेत्या खेळाडूंना आयुष्यभरासाठी मोफत विमान प्रवास करू देण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आमच्या ऑलिम्पिक विजेत्यांना सर्वोत्तम सेवा देऊ इच्छितो.
स्टार एअर ही भारतातील सर्वात नवी विमान वाहतूक करणारी कंपनी आहे. ही कंपनी भारतातील केवळ १३ शहरांना जोडणारी असली, तरीही या कंपनीने ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंच्या सन्मानार्थ त्यांना मोफत विमान प्रवासाची संधी आयुष्यभरासाठी दिली आहे. त्याबरोबरच या कंपनीने या खेळाडूंचे अभिनंदन देखील केले असून, देशाच्या आशांचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतल्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.