भारतात आजपासून ग्राहकांना आयफोन १५ सीरिजचे फोन खरेदी करता येणार आहेत. आयफोन १५च्या सीरिजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आज हा फोन खरेदी करण्यासाठी खरेदीदारांची मोबाइल स्टोअर्समध्ये तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी १५ तासांहून अधिक वेळ लाइनमध्ये उभे राहावे लागले. मुंबईतील अनेक स्टोअरच्या बाहेर अशीच स्थिती असल्याचे पाहायले मिळाले.
हेही वाचा :
सनातन धर्मावर टिप्पणी केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिनला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !
जस्टिन ट्रुडो ५० वर्षातील कॅनडाचे सर्वात वाईट पंतप्रधान!
महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानीला मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !
महाराष्ट्रात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी अदानीला मिळाले १३,८८८ कोटी रुपयांचे कंत्राट !
आयफोन १५ वैशिष्ये
- आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसमध्ये A16 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट
- फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा.
- आयफोन १५ प्रो मॉडेल्समध्ये अॅक्शन बटण. ज्याच्या मदतीने वापरकर्त्यांना अनेक कामे करता येणार.
- टायटॅनियम बॉडीचा वापर.
- बेजल देखील कमी करण्यात आले.
- आयफोन १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्स अनुक्रमे ६.१ आणि ६.७ इंचाचा डिस्प्ले.
- आयफोन १५ च्या डिस्प्लेचा आकार ६.१ इंच आणि आयफोन १५ प्लस डिस्प्लेचा आकार ६.७ इंच. दोन्ही मॉडेल्सना सिरॅमिक ग्लासचे संरक्षण.
- आयफोन १५ ची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरु. आयफोन १५ प्लसची किंमत ८९,९०० रुपये. आयफोन १५प्रो ची किंमत १,३९,९०० रुपये. आयफोन १५ प्रो मॅक्सची किंमत १,५९,९०० रुपयांपासून सुरु.