एल साल्वाडोर येथील फुटबॉल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. राष्ट्राध्यक्ष नायिब बुकेले यांनीया घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय नागरी पोलिस आणि ऍटर्नी जनरल कार्यालय या घटनेची सखोल चौकशी करतील, असे त्यांनी जाहीर केले.
एल साल्वाडोरमधील सॉकर स्टेडियममध्ये शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १२ जणांचा मृत्यू झाला. तर, जखमींची ठोस संख्या अद्याप कळू शकलेली नाही. अलियान्झा एफसी आणि क्लब डेपोर्टिवो एफएएस यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू होता. देशाची राजधानी सॅन साल्व्हाडोरमधील कस्कॅटलान स्टेडियम येथे प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्यामुळे खेळ थांबवण्यात आला. हे ठिकाण मध्य अमेरिकेतील सर्वात मोठ्या स्टेडियमपैकी एक आहे आणि त्याची अधिकृत प्रेक्षकक्षमता ४४ हजारांहून अधिक आहे.
द साल्वाडोरन कस्कॅटलान स्टेडियममध्ये घडलेल्या घटनेबद्दल फुटबॉल फेडरेशननेही ट्विटरच्या माध्यमातून खेद व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या व्यक्तींप्रति शोक व्यक्त केला. फुटबॉल फेडरेशनही या घटनेचा अहवाल मागवणार आहे.
हे ही वाचा:
ने मजसी ने, जयोस्तुते या कविता अभ्यासक्रमात समाविष्ट व्हाव्यात!
कारगिल हुतात्मा वडिलांसाठी त्याने मॅनेजमेंटचा मार्ग सोडला, स्वीकारली लष्करी अकादमी
मी नार्को टेस्टला तयार, मग बजरंग, विनेशचीही करा!
‘पापुआ न्यू गिनी’च्या पंतप्रधानांनी मोदींच्या पायाला केला स्पर्श!
या घटनेनंतर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. तसेच, या घटनेबाबत क्रीडा सुरक्षा आयोगाशी चर्चा केली जाईल, असेही फेडरेशनने जाहीर केले.
एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनी राष्ट्रीय नागरी पोलिस आणि ऍटर्नी जनरल कार्यालय स्टेडियममधील घटनांची सखोल चौकशी करतील, असे जाहीर केले. ‘प्रत्येकाची चौकशी केली जाईल. संघ, व्यवस्थापक, स्टेडियम, तिकीट देणारे, लीग, फेडरेशन इ. कोणीही दोषी असले तरी त्यांना माफ केले जाणार नाही,’ असे बुकेले यांनी ट्विटरवर जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियाच्या पूर्व जावा येथील स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १३५ प्रेक्षक मृत्युमुखी पडले होते. पोलिसांनी जमावावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर बाहेर पळण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाला होता.