तिरुपती मंदिरात तिकीट केंद्रावर चेंगराचेंगरी; ६ ठार

४ हजार भाविक जमले होते

तिरुपती मंदिरात तिकीट केंद्रावर चेंगराचेंगरी; ६ ठार

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात बुधवारी चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे ६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ ही दुर्घटना घडली.
१० दिवसाच्या विशेष दर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. जवळपास ४ हजार भाविक तिथे जमले होते.
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल सांगितले की, आपण या घटनेमुळे खूप दुःखी असून जखमींना त्वरित उपचार मिळावेत याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जानेवारी १० ते १९ या काळात वैकुंठ एकादशी आणि वैकुंठ द्वार दर्शनम यासाठी भाविक मोठ्या संख्येने आले होते. मृतांपैकी एक मल्लिका नावाची महिला असल्याचे कळले आहे.
तिरुमला देवस्थानचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी याबाबत तातडीची बैठक घेतली. यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

मंगल प्रभात लोढांच्या हस्ते देशातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण!

दिल्ली निवडणुकीत तृणमूलचा आपला पाठिंबा, केजरीवाल म्हणाले ‘धन्यवाद दीदी’

सर्व वाद बाजुला ठेवा आणि ‘इमर्जन्सी’ पाहा!

भाजप मुख्यमंत्र्यांच्या घरी तरी आप नेते पंतप्रधानांच्या घरी

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जखमींना योग्य उपचार मिळावेत याची काळजी घेण्यास सांगितले आहे. प्रमुख अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती करून मदतकार्य वेगाने होईल याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

चंद्राबाबू गुरुवारी मंदिराला भेट देणार असून जिथे ही घटना घडली त्याचा आढावा घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पण विरोधी पक्षांनी यावरून राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. या गर्दीचे योग्य नियंत्रण सरकारला करता आले नाही, असा आरोप केला आहे.

Exit mobile version