मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे टर्मिनल्सच्या फलाट क्रमांक एक वर आज पहाटेच्या सुमारास ही चेंगराचेंगरीची घटना घडली. या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
दिवाळीमुळे गावाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बस स्थानकासह रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. याच दरम्यान, आज सकाळी ५.५६ वाजता वांद्रे टर्मिन्सच्या फलाट क्रमांक १ वर चेंगराचेंगरी झाली. वांद्रे टर्मिन्सवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लागलेल्या २२९२१ वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. एक्सप्रेसमध्ये चढण्याच्या नादात प्रवाशांची चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ९ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
शबीर अब्दुल रेहमान (४०), परमेश्वर सुखधर गुप्ता (२८), रविंद्र हरिह चुमा(३०), रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजामती (२९), संजय तिलकराम कांगय (२७), दिव्यांशू योगेंद्र यादव (१८), मोहम्मद शरीफ शेख (२५), इंद्रजित सहानी (१९), नूर मोहम्मद शेख (१८), अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
हे ही वाचा :
काँग्रेस महाविकास आघाडीत राहील असे वाटत नाही!
कराचीमधून अपहरण झालेले आठ बलुच विद्यार्थी घरी परतले!
नामदेवराव जाधव यांचा ‘छत्रपती शासन’ हा नवा पक्ष!
भाजपाकडून दुसरी यादी जाहीर; गोपीचंद पडळकरांसह, राम भदाणे निवडणूक रिंगणात