प्रतिज्ञापत्राची पडताळणी सुरू, गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे जबाब

ठाकरे आणि शिंदे गटाची सत्यता शोधण्याचा प्रयत्न

प्रतिज्ञापत्राची पडताळणी सुरू, गुन्हे शाखेकडून घेण्यात येत आहे जबाब

हजारोंच्या संख्येने वांद्रे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांना आढळलेल्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्राचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून या प्रतिज्ञापत्राची पडताळणी सुरू करण्यात येत असून प्रतिज्ञापत्रात ज्या व्यक्तीचे नाव आहे, त्याचा जबाब नोंदविण्यात येत आहे. लवकरच या प्रतिज्ञापत्राची सत्यता समोर येईल अशी शक्यता पोलीस दलाकडून वर्तवली जात आहे.

वांद्रे न्यायालयाच्या समोर असलेल्या एका दुकानाच्या बाहेरून निर्मल नगर पोलिसानी मोठ्या प्रमाणात स्टँप पेपर वर असलेले प्रतिज्ञापत्र आणि लाल शिक्के जप्त केले होते. हे सर्व प्रतिज्ञापत्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठींबा देण्यासाठी तयार करण्यात येत होते असा आरोप शिंदे गटाचे ठाणे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’, तर शिंदेंना ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव

सिद्धू मुसेवाला हत्येतील आरोपीच्या प्रेयसीला मुंबईत अटक

म्हणून लोकलमध्ये महिलांमध्ये होते हाणामारी

विकास हवा असल्यास प्रकल्पांना विरोध नको

 

हे प्रतिज्ञापत्र ज्या स्टँपपेपर वर तयार करण्यात आले आहे ते स्टॅम्प पेपर खरे आहेत का? एवढ्या मोठ्या प्रमाणात हे स्टॅम्प पेपर कुठून मिळवले तसेच हे प्रतिज्ञापत्र कुणाच्या नावाने तयार करण्यात आले आहेत याचा तपास करण्यासाठी हा गुन्हा पुढील तपासासाठी गुन्हे शाखा कक्ष ९ कडे सोपविण्यात आला आहे.
गुन्हे शाखा कक्ष ९ कडून या प्रतिज्ञापत्राची पडताळणी सुरू करण्यात आलेली असून या प्रतिज्ञापत्र तयार करून नोटरी करून देणाऱ्याचा जबाब नोंदविण्यात आलेला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
तसेच हे प्रतिज्ञापत्र लिहून देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांचे जबाब नोंदविण्यात येत आहे.

Exit mobile version