सर्वोच्च न्यायालयाने आज द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘सनातन धर्मा’वर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीबद्दल फटकारले आहे. स्टॅलिन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.स्टॅलिन यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही टीपणी केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. तुम्ही काय बोलता हे तुम्हाला तरी माहित आहे का? तुम्हाला त्याचे परिणाम काय होतील याची जाणीव व्हायला हवी होती. तुम्ही मंत्री आहात, सामान्य माणूस नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा..
मतदानासाठी लाच घेणाऱ्या खासदार, आमदारांवर कारवाई होणार
१० लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी छत्तीसगडमध्ये ठार, जवानही हुतात्मा!
यशस्वी जयस्वालची नजर या पाच ऐतिहासिक विक्रमांवर
भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रोसेवेचे उद्घाटन मोदी करणार
स्टॅलिन यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी एफआयआर क्लब करण्याचा युक्तिवाद करताना अर्नब गोस्वामी, मोहम्मद झुबेर आणि इतरांच्या खटल्यांमधील निकालांचा त्यांनी हवाला दिला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असे सुचवले की द्रमुक नेते त्याऐवजी उच्च न्यायालयात जाऊ शकतात.सिंघवी म्हणाले, जर आपण वेगवेगळ्या न्यायालयात गेलो तर यामध्ये बराच वेळ जाईल. यावर न्यायालयाने त्यांना पुढील आठवड्यात सुनावणीसाठी या प्रकरणाची यादी करण्यास सांगितले आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांचा समावेश असलेला वाद हा जातिव्यवस्था आणि भेदभावावर आधारित असल्याचे म्हणत ‘सनातन धर्म’ निर्मूलनाचे आवाहन करताना सप्टेंबर २०२३ मध्ये केलेल्या टिप्पणीवरून उद्भवला आहे. त्यावेळी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना आणि मालेरीयाशी केली होती. त्यांच्या या विधानावरून देशात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. सनातन धर्म मानणाऱ्याच्या भावना दुखावल्या होत्या.