चेन्नईतील प्रेसिडन्सी कॉलेजमध्ये माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या पुतळ्याचे तमिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी सोमवारी अनावरण केले. त्यांनी या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना आमंत्रित केले होते. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी स्टॅलिन यांनी व्हीपी सिंह यांना मागास वर्गाचे नेता असे संबोधले. मात्र या कार्यक्रमाला इंडिया आघाडीचे अन्य नेते विशेषतः बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आमंत्रण नव्हते. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या चर्चेला उधाण आले आहे.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावर १५ इंटरसेप्टर वाहने
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यासाठी प्रियकराला मदत!
तीन वर्षांत ९०० बेकायदा गर्भपात!
महात्मा गांधी गेल्या शतकातील महापुरुष; तर मोदी या शतकातील ‘युगपुरूष’
तमिळनाडूत व्हीपी सिंह यांचा पुतळा का?
व्हीपी सिंह यांच्या प्रयागराज या मूळ जिल्ह्याच्या बाहेर तमिळनाडूत त्यांचा पुतळा का बसवण्यात आला? याचे उत्तर ८० दशकात लागू झालेल्या मंडल आयोगाच्या शिफारसी आणि तत्कालीन राजकीय परिस्थितीत दडले आहे. सत्ताधारी काँग्रेसने या शिफारसी १० वर्षे लागू केल्या नाहीत. २ डिसेंबर १९८९मध्ये नॅशनल फ्रंट सरकार स्थापन झाले आणि व्हीपी सिंह पंतप्रधान झाले. सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या. त्यामुळे मागासवर्गीयांना केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये २७ टक्के आरक्षण मिळाले. स्टॅलिन यांनी याचा उल्लेख पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी केला. मंडल आयोगाच्या शिफारसी मान्य करून सामाजिक न्याय देणारा नेता म्हणून आपण व्हीपी सिंह यांना आदरांजली वाहात आहोत, असे स्टॅलिन यांनी यावेळी स्पष्ट केले.
अखिलेशच्या माध्यमातून मागासवर्गीय मतांवर डोळा
अखिलेख आणि स्टॅलिन हे इंडिया आघाडीचे घटकपक्ष असले तरी मध्य प्रदेशमधील निवडणुकीत काँग्रेसने जागावाटपात समाजवादी पक्षाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखिलेश यांनी इंडिया आघाडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी नुकताच तेलंगणात जाऊन चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा प्रचार केला. अखिलेश यांच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील मागासवर्गीय आणि बिहारमदील राजद आणि जनता दलाची सोबत घेता येऊ शकते, असे स्टॅलिन यांना वाटत असल्याचे सांगितले जात आहे. तिसऱ्या आघाडीला मजबूत करण्यासाठी हे आवश्यक आहे.