सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, सेंड अँड्र्यूज कॉलेजला जेतेपद

नेहरू चषक विभागीय हॉकी स्पर्धा

सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, सेंड अँड्र्यूज कॉलेजला जेतेपद

सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल (वांद्रे) आणि सेंट अँड्र्यूज कॉलेज (वांद्रे) संघांनी डिकॅथ्लॉन स्पोर्ट्स इंडिया, वरळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रीडा परिषद नेहरू चषक विभागीय हॉकी स्पर्धेत अनुक्रमे सब-ज्युनियर (१५ वर्षांखालील) आणि ज्युनियर (१७ वर्षांखालील) मुले गटात विजेतेपद पटकावले.

 

एमएचएएल स्टेडियम, चर्चगेट येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत शुक्रवारी १५ वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या सेंट स्टॅनिस्लॉस संघाने डॉन बॉस्को, माटुंगा (मुंबई शहर)संघावर १-० असा रोमांचक विजय मिळवला. फॉरवर्ड स्काय डिकोस्टा याचा एकमेव गोल निर्णायक ठरला.

 

 

त्यानंतर झालेल्या १७ वर्षांखालील गटातील चुरशीच्या फायनलमध्ये मुंबई उपनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या सेंट अँड्र्यूज संघाने मुंबई शहर विभागाच्या डॉन बॉस्को (माटुंगा) संघाचा ३-२ असा पराभव केला. शॉन डिमेलोची गोल हॅट्ट्रिक हे सेंट अँड्र्यूजच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

 

हे ही वाचा:

लष्कराचे सामर्थ्य वाढणार; ४५ हजार कोटींची स्वदेशी उपकरणे खरेदीला मंजुरी

बारामुल्लामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

चंद्रावर पाणी असल्याला पृथ्वीचे वातावरण जबाबदार

उद्धवजी दंगली कोण घडवतायत ते जरा बघा

पहिल्या क्वार्टरमध्ये शॉन याने सेंट अँड्र्यूजचे खाते उघडले. मात्र, दुसर्‍या क्वार्टरमध्ये दोन गोल करून डॉन बॉस्कोने हाफ टाइममध्ये २-१ अशी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर रत्नेश चिलीने पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून डॉन बॉस्कोला २-२ अशी बरोबरी साधून दिली त्याआधी श्रद्धा खामकरने दुसरा गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्ये शॉन याने दोन झटपट गोल करून सेंट अँड्र्यूजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

अंतिम फेरी निकाल – सब-ज्युनियर मुले: सेंट स्टॅनिस्लॉस, वांद्रे १ (स्काय डिकोस्टा) डॉन बॉस्को, माटुंगा ०.
ज्युनियर मुले फायनल: सेंट अँड्र्यूज, वांद्रे ३ (शॉन डिमेलो 3) डॉन बॉस्को, माटुंगा २ (रत्नेश चिले, श्रद्धा खणकर प्रत्येकी १ गोल).

Exit mobile version