बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!

सरकारकडून घसघशीत बोनस जाहीर

बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!

अवघा महाराष्ट्र दिवाळसणाची तयारी सुरू असताना बेस्ट, राज्य परिवहन आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. राज्य सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांसाठी घसघशीत बोनस जाहीर केला आहे.

एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट ६,००० रुपयांचा
बोनस जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिका तसेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये बोनस देण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्त आय एस चहल यांच्यासह मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना २६ हजार रूपये बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. गेल्या वर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान देताना पहिल्यांदाच २५०० ने वाढ करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करून २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेली गट विमा योजना २०१७ पासून बंद होती.

हे ही वाचा:

अमेरिकन गायिका मिलबेनने नीतिशकुमारना सुनावले!

बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!

मराठा समाजात जन्म झाला हा गुन्हा आहे का? म्हणत मराठा तरुणाची आत्महत्या

बीएमडब्ल्यू हॉटेलमध्ये घुसली, ऑस्ट्रेलियातील पाच भारतीय वंशाचे नागरीक मृत

ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देतानाच त्यात वाढ करून पाच लाखापर्यंतची गट विमा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला.तसेच ही योजना जानेवारी २०२४ पासून लागू करण्याबाबत प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्देश दिले आहेत.त्याच बरोबर आशा सेविकांना बोनस म्हणून एका महिन्याचा पगार देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत आज बैठक पार पडली.

मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आल्या. त्यानुसार खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी २४० दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाशी बैठक घेऊन निर्णय देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे कॅशलेस मेडिक्लेम योजनेसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर रुग्णालयांची निवड करण्यात येईल. या रुग्णालयामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची बिले महामंडळ देय करणार आहे. त्याचप्रमाणे घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत ३० नोव्हेंबरपूर्वी निर्णय घेण्यात येईल.
तसेच एसटी महामंडळास स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी यंदाच्या वर्षी ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version